30 C
Mumbai
Wednesday, January 7, 2026
घरविशेषपाकिस्तानच्या कट्टरपंथाला साथ देऊ नका

पाकिस्तानच्या कट्टरपंथाला साथ देऊ नका

Google News Follow

Related

अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील वाढत्या जवळीकीवर टीका करत, प्रमुख बलुच मानवाधिकार कार्यकर्ते मीर यार बलूच यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना एक सुस्पष्ट पत्र लिहून पाकिस्तानसारख्या कट्टरवादी राष्ट्राशी पुन्हा एकदा संबंधांचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.

मीर यार बलूच यांनी बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी व समर्थन करावे, अशीही मागणी ट्रम्प यांच्याकडे केली आहे.

पत्रात मीर बलूच म्हणतात, “पाकिस्तानचे सेनाप्रमुख असीम मुनीर लवकरच अमेरिकेच्या दौर्‍यावर येत आहेत. मुनीर अशा संस्थेचे नेतृत्व करतात, जी पाकिस्तानकब्जीत असलेल्या बलुचिस्तानमध्ये मानवाधिकारांचे गंभीर उल्लंघन करत आहे. पाकिस्तानी लष्कर आणि त्यांची गुप्तचर संस्था आयएसआय यांनी आतापर्यंत ४०,००० हून अधिक बलुच नागरिक बेपत्ता केले आहेत. शिवाय, त्यांनी ओसामा बिन लादेनसारख्या जागतिक दहशतवाद्यांना आश्रय दिला.”

ते पुढे लिहितात, “जनरल मुनीर यांना आपण सन्मानपूर्वक विचारावे की, पाकिस्तान कोणत्या नैतिक वा कायदेशीर अधिकाराने बलुचिस्तानच्या नैसर्गिक संपत्तीवर दावा करतो? तो जर पंजाबमधील अशाच संपत्तीवर दावा करू शकतो का?”

बलुचिस्तान — एक दुर्लक्षित पण संपन्न भूभाग

पत्रात बलुच समुदायाच्या वतीने मीर यार बलूच यांनी लिहिले आहे की,
बलुचिस्तान हा पाकिस्तान आणि इराणच्या बेकायदेशीर कब्जात असलेला एक प्राचीन, स्वतंत्र राष्ट्र आहे. तो खनिज, तेल, वायू, भू-राजकीय महत्त्व, विमानतळ व बंदरांच्या बाबतीत अत्यंत संपन्न आहे. पण तरीही हा भूभाग दडपशाहीच्या छायेखाली आहे. बलुच संस्कृती ही धर्मनिरपेक्ष आणि शांतताप्रिय असून, तिच्यावर सातत्याने आघात केला जात आहे.”

‘९/११ नंतर अमेरिका फसली’ — पाकिस्तानचा दुटप्पीपणा

पत्रात मीर बलूच यांनी ठामपणे म्हटले की,
९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानवर विश्वास ठेवून मोठी चूक केली. पाकिस्तानने सदैव दुटप्पी भूमिका घेतली आहे. बलुच, सिंधी आणि पश्तून यांसारख्या धर्मनिरपेक्ष, दहशतवादविरोधी गटांना बळ देण्याऐवजी अमेरिकेने पाकिस्तानी लष्कराला समर्थन दिले. पण तेच लष्कर दहशतवादाला खतपाणी घालत आहे.”

आयएसआयच्या छायेत ISIS, दाएशसारख्या दहशतवादी गटांचे प्रशिक्षण केंद्रे सध्या वाढत आहेत. हे संपूर्ण क्षेत्र आणि जागतिक सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे.”

बलुचांचे धार्मिक सहिष्णुतेचे आवाहन

पाकिस्तान ६ कोटी बलुच जनतेच्या हक्कांना पायदळी तुडवत आहे. बलुच समाजाने सर्व धर्मांप्रती आदर व सहिष्णुता राखली आहे. आम्हाला हिंदू, बौद्ध, ज्यू, ख्रिश्चन वा इतर धर्मांबद्दल कोणताही द्वेष नाही.”

त्यांच्या मते, “पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयमधील अतिरेकी प्रवृत्ती मात्र पश्‍चिमविरोधी भावना पसरवण्यासाठी कट्टर धार्मिक गटांचा वापर करत आहेत.

“अमेरिकेचा पाठिंबा चुकीच्या गटांना?”

मीर बलूच यांनी स्पष्ट प्रश्न उपस्थित केला आहे —
अमेरिका अशा शासनसंस्थांना पाठिंबा देत राहणार का, ज्या त्यांच्या कार्यक्रमांमध्ये ‘अमेरिका-इजरायल मुर्दाबाद’ असे नारे लावू देतात?

शेवटी त्यांनी बलुच स्वातंत्र्यवादी नेतृत्वाशी थेट संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले, “हिर्बयार मरी व फ्री बलुचिस्तान मूव्हमेंटसारख्या धर्मनिरपेक्ष, शांतताप्रिय व विकासाभिमुख गटांशी अमेरिका संवाद सुरू करावा.

मीर बलूच यांनी आशा व्यक्त केली की, अमेरिका हा मुद्दा फक्त राजकारण म्हणून न पाहता, न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा