25 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरविशेषबांगलादेशातील हिंदू धोक्यात, एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या!

बांगलादेशातील हिंदू धोक्यात, एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या!

गर्भवती महिलेलाही सोडले नाही

Google News Follow

Related

हसीना शेख यांनी बांगलादेश सोडल्यानंतर सत्तापरिवर्तन झाले, सर्व काही सुरळीत आहे असे दिसत आहे. मात्र, असे दिसत असले तरी अजूनही हिंसाचार संपलेला नाही. हिंदुंना अजूनही टार्गेटकरून मारले जात आहे. किशोरगंज जिल्ह्यातील भैरब शहरातून हिंसाचाराचे ताजे प्रकरण समोर आले आहे, जिथे एका अपार्टमेंटमध्ये हिंदू कुटुंबातील ४ लोक मृतावस्थेत आढळले आहेत. जॉनी बिस्वास, त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा यामध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे, मृत जॉनी बिस्वास यांची पत्नी हि गर्भवती होती. दरम्यान, या प्रकरणी बांगलादेश पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस प्रशासनाने ही हत्या नसून आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर जॉनी बिस्वासने आत्महत्या केल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.

या भीषण घटनेनंतर संपूर्ण परिसरात प्रचंड तणाव आणि भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून हिंदू समाजातील वाढती भीती कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. परंतु खरी परिस्थिती यापासून दूर आहे कारण बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवरील हिंसाचार दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांबाबत भारत सरकारने कठोर भूमिका स्वीकारली असून अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे, असे म्हटले आहे.

हे ही वाचा : 

गुजरातमध्ये एका सिरीयल किलरला अटक

‘इस्कॉन बांगलादेश’चे चिन्मय कृष्ण दास यांना समर्थन, म्हणाले पाठीशी आहोत!

१२ किलो वजनी व्हेल माशाची उल्टी जप्त!

शेवटच्या काही तासांमध्ये मतदानाचा टक्का कसा वाढला? निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा