राज्यासह देशात बांगलादेशी आणि रोहिंग्यां घुसखोरांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. पोलिसांकडून याविरोधात कारवाई सुरू असून घुसखोर नागरिकांना शोधून कारवाई केली जात आहे. हिंदुत्ववादी संघटनाही आवाज उठवत या समस्येला वाचा फोडत आहेत. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर आढळून आले आहेत. इतकेच नव्हे तर हे घुसखोर बनावट कागदपत्रांच्या मदतीने थेट सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याची प्रकरणेही समोर आली आहेत.
अशा घुसखोरांविरुद्ध वारंवार भाजपा नेते किरीट सोमय्या आवाज उठवत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना भेट देवून बेकादेशीररित्या दिलेल्या जन्मप्रमाणपत्राची पडताळणी ते करत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी काल (१५ एप्रिल) बीड जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना भेट दिली होती. या भेटीनंतर तहसील कार्यालयाने दोन हजारांहून अधिक बेकादेशीर जन्म प्रमाणपत्र रद्द केली आहेत. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत याची माहिती दिली.
ट्वीटकरत ते म्हणाले, बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी काल बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ आणि गेवराई तहसीलदारांची भेट घेतली. यासह पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि चर्चा केली. या चर्चेनंतर नायब तहसीलदार, तहसीलदार कार्यालयाने बेकायदेशीर रित्या दिलेले परळी वैजनाथ येथील १३८९ आणि गेवराई येथील १२०७ जन्म प्रमाणपत्र आता रद्द केले आहेत.
हे ही वाचा :
जुन्या वेदना चार पट वाढवतात डिप्रेशनचा धोका
‘जर वक्फ कायद्याचा निर्णय आमच्या बाजूने आला नाही तर आम्ही संपूर्ण भारत ठप्प करू’
टूथब्रशपेक्षा का श्रेष्ठ आहे आयुर्वेदातील दातुन
१३ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा बस्तरमध्ये खात्मा
दरम्यान, किरीट सोमय्या परळीत येत असल्याची माहिती मिळताच काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी शिवाजी चौक आणि एक मिनार चौकात सोमय्या यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. दरम्यान, सोमय्या यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच ते सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा
काल मी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ आणि गेवराई तहसीलदार, पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली, चर्चा केली
नायब तहसीलदार, तहसीलदार कार्यालयाने बेकायदेशीर रित्या दिलेले परळी वैजनाथ येथील 1389 आणि गेवराई येथील 1207 जन्म प्रमाणपत्र आता रद्द केले… pic.twitter.com/UdzFfTgvG4
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 16, 2025