28.4 C
Mumbai
Saturday, April 26, 2025
घरक्राईमनामा१३ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा बस्तरमध्ये खात्मा

१३ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा बस्तरमध्ये खात्मा

शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त

Google News Follow

Related

केंद्र सरकारने नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याची भूमिका घेतल्यानंतर नक्षली हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. सुरक्षा दलाच्या कारवाईत अनेक माओवादी ठार झाले आहेत, अनेक माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. अशातच छत्तीसगडच्या बस्तर भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मोठे यश मिळाले असून दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दोघांवर १३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

बस्तर रेंजचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी बुधवारी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी कोंडागाव आणि नारायणपूर जिल्ह्यांच्या सीमेवर ही चकमक झाली. त्यावेळी सुरक्षा दलांचे एक संयुक्त पथक किलम-बरगम गावाच्या जंगलात नक्षलविरोधी कारवाईवर होते. मग जंगलात गोळीबार सुरू झाला. सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकात कोंडागाव येथील राज्य पोलिसांचे जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि बस्तर फायटर्सचे कर्मचारी होते, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, चकमकीनंतर शोध मोहिमेदरम्यान, घटनास्थळी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. त्यांच्याकडून एके-४७ रायफल, इतर शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली.

नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. एक कुख्यात कमांडर आणि पूर्व बस्तर माओवादी विभागाचा सदस्य आहे आणि एक जण क्षेत्र समितीचा सदस्य आहे. कमांडर हलधरवर ८ लाख रुपये आणि रामेनवर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. पोलीस बराच काळ या दोघांचा शोध घेत होते. दरम्यान, या परिसरात सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरूच आहे. गुप्त माहितीच्या आधारे, विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. या वर्षी ३ महिन्यांत राज्यात वेगवेगळ्या चकमकींमध्ये १४० माओवादी मारले गेले आहेत. यापैकी बस्तर विभागातील नारायणपूर आणि कोंडागावसह फक्त ७ जिल्ह्यांमध्ये १२३ जणांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा : 

अनधिकृत दर्गा हटवण्यापूर्वीचं राडा, पोलिसांवर दगडफेक; नाशिकमध्ये मध्यरात्री काय घडलं?

अमेरिकेकडून मिळालेल्या दणक्यांनंतर चीनसाठी भारत जवळचा; ८५,००० हून अधिक व्हिसा जारी

दुबईतील बेकरीत पाकिस्तानी नागरिकाने केलेल्या हल्ल्यात तेलंगणातील दोघांचा मृत्यू

‘मोदी काफीर आहेत, त्यांना मत देणारेही काफिर’

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांना शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले. तसेच मार्च २०२६ पर्यंत छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील लाल दहशतवाद संपवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असा पुनरुच्चारही अमित शाह यांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
244,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा