28 C
Mumbai
Saturday, September 19, 2026
घरविशेषचेंबूरमध्ये बेस्टच्या इलेक्ट्रिक बसला अचानक आग

चेंबूरमध्ये बेस्टच्या इलेक्ट्रिक बसला अचानक आग

चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

मुंबईतील चेंबूर परिसरात बेस्टच्या इलेक्ट्रिक बसला अचानक आग लागल्याची घटना रविवारी घडली. महुल गाव ते ट्रॉम्बे या मार्गावर धावणारी बस चेंबूर कॅम्प परिसरातील आरसीएफ मोनोरेल स्थानकाजवळ पोहोचली असताना बसच्या खालच्या भागातून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालकाने तातडीने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. तपासणी केली असता बसच्या बॅटरी बॉक्समध्ये ठिणग्या पडत असल्याचे दिसून आले आणि काही क्षणांतच बॅटरीच्या भागाला आग लागली.

आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील कर्मचाऱ्यांनी कोणतीही घबराट न करता तातडीने अग्निशामक सिलिंडरच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. तब्बल १५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी बसची बॅटरी जोडणी तोडली आणि बॅटरी सुरक्षितपणे बाहेर काढली. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला किंवा कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही. चालकाने वेळीच धूर ओळखून बस थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
जरांगे पाटलांच्या मुंबईतील उपोषणाला पोलिसांची परवानगी नाही

नालासोपाऱ्यात गणेशमूर्ती भाविकांच्या अंगावर कोसळली

ब्रिक्स विरुद्ध डॉलर

पश्चिम बंगालमध्ये पद्मा नदीत बोट उलटली

प्राथमिक माहितीनुसार, बॅटरी बॉक्समध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा संशय आहे. ही बस खासगी ऑपरेटरकडून ‘वेट लीज’ पद्धतीने चालवली जात होती. इलेक्ट्रिक बसला आग लागण्याची घटना समोर आल्यानंतर बेस्टच्या इलेक्ट्रिक बसच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. बॅटरीची नियमित तपासणी, तांत्रिक यंत्रणेची देखभाल आणि संभाव्य बिघाडांची वेळीच दखल घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
334,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा