27 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरविशेषसैफ-अर्जूनच्या 'भूत पोलिस' चा ट्रेलर प्रदर्शित

सैफ-अर्जूनच्या ‘भूत पोलिस’ चा ट्रेलर प्रदर्शित

Related

‘भूत पोलीस’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस, यामी गौतम अशी तगडी स्टार कास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट डिजिटली रिलीज डिज्नी प्लस हॉटस्टार या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हॉरर कॉमेडी या प्रकारात मोडणारा हा चित्रपट असणार आहे.

हॉरर कॉमेडी हा काही चित्रपटांमध्ये काही नवीन ट्रेंड नाही. आजवर असे अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये आले आहेत. भूत पोलीस देखील त्याच धाटणीचा चित्रपट आहे. भूत पोलीस या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे. तर निर्मिती रमेश तौरानी आणि आकाश पुरी यांची आहे. पुढल्या महिन्यात १७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट डिज्नी प्लस हॉटस्टार वर रिलीज होणार आहे.

हे ही वाचा:

तालिबानी पिलावळीचा धोका…

तालिबानपासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी काय करत आहेत महिला?

पुणे पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही थोडे ब्रह्मज्ञान द्यावे

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अर्जुन कपूर आणि सैफ अली खान हे दोघं एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि सैफ अली खान हे भूत पळवणाऱ्या दोन भावांच्या भूमिकेत दिसणार आहेत. बुधवार, १८ ऑगस्ट रोजी या चित्रपटाचे अधिकृत ट्रेलर रिलीज झाले असून आतापर्यंत लाखो लोकांनी हे ट्रेलर पाहिले आहे. त्यामुळे आता हा मल्टिस्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? हे पुढल्या महिन्यात कळणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा