25 C
Mumbai
Wednesday, September 11, 2024
घरविशेषमुरादाबाद बलात्कार प्रकरण; आरोपी शाहनवाजच्या कुटुंबाचे ३ मदरसे सील !

मुरादाबाद बलात्कार प्रकरण; आरोपी शाहनवाजच्या कुटुंबाचे ३ मदरसे सील !

या प्रकरणातील अन्य दोन आरोपींच्या संपत्तीवर होणार कारवाई

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात एका दलित नर्सवर झालेल्या बलात्कार प्रकरणी योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. आरोपी डॉक्टर शाहनवाजच्या कुटुंबांकडून चालवण्यात येणाऱ्या तीन मदरशांसह खाजगी मालमत्ता प्रशासनाने सील केली आहेत. त्याचबरोबर अन्य दोन आरोपींची वैयक्तिक मालमत्ता सील करण्याची तयारी जोरात सुरू करण्यात आली आहे.

सरकारने सील केलेल्या तीन मदरशांचे व्यवस्थापक शकील आहेत, जे या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. शाहनवाजचे वडील आहेत. कारवाई करून सील करण्यात तीन मदरशांपैकी यातील दोन मदरसे सरकारी जमिनीवर आहेत, तर एक मदरसा खाजगी जमिनीवर स्थापित करण्यात आला आहे. यामध्ये एक वसतिगृह देखील असल्याची माहिती आहे.

मुरादाबादचे अल्पसंख्याक अधिकारी, एसडीएम ठाकुरद्वारा मणि अरोरा आणि सीओ ठाकुरद्वारा यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासानंतरच मदरशांची कागदपत्रे सील करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अल्पसंख्याक विभाग आणि प्रशासकीय पथकांकडून मदरशांच्या संपूर्ण कागदपत्रांची कसून चौकशी सुरू आहे, जेणेकरून मदरशांशी संबंधित सर्व बाबींची माहिती मिळू शकेल. मीडियाशी बोलताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी मदरसे तपासाच्या उद्देशाने सील करण्यात आले असून तपास पूर्ण करून लवकरच अहवाल सरकारला सादर केला जाईल.

हे ही वाचा :

आसाम गँगरेप: मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला, तलावात उडी मारून मृत्यू

बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर मुंबई, ठाण्यातील शिक्षणाधिकारी निलंबित

‘गब्बर’चा क्रिकेटला अलविदा!

नेपाळ बस अपघातात महाराष्ट्रातील २४ पर्यटकांचा मृत्यू; वायुसेनेच्या विमानाने मृतदेह राज्यात आणणार

दरम्यान, आठवडाभरापूर्वी ठाकूरद्वारातील एबीएम हॉस्पिटलमधील आरोपी डॉक्टर शाहनवाजने एका नर्सला बंधक बनवून तिच्यावर रात्रभर बलात्कार केला होता. यानंतर पोलिसांनी डॉक्टर आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक करून तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपीच्या कुटुंबांवर कारवाई करत तीन मदरसे सील करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणातील अन्य दोन आरोपींची वैयक्तिक मालमत्ताही जप्त होण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडून बलात्काराच्या आरोपींवर सातत्याने कारवाई सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
176,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा