27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषपंजाबच्या अमृतसरमध्ये अनिवासी भारतीयावर गोळीबार

पंजाबच्या अमृतसरमध्ये अनिवासी भारतीयावर गोळीबार

Google News Follow

Related

अलीकडेच अमेरिकेतून परतलेल्या एका अनिवासी भारतीयावर शनिवारी पंजाबमधील अमृतसरच्या डाबुर्जी भागातील त्याच्या राहत्या घरी गोळ्या झाडण्यात आल्या. दोघे सशस्त्र सुखचैन सिंग यांच्या निवासस्थानी घुसले. तेव्हा त्यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांच्या जीवाची याचना केली असतानाही त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. सिंग यांना दोन गोळ्या लागल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंग यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा हल्ला कैद झाला आहे. फुटेजमध्ये हल्लेखोर पिस्तुल जाम केल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाताना दिसले.

सुखचैन सिंग हे अमेरिकेत राहत होते. सुमारे २० दिवसांपूर्वी अमृतसरला ते परतले होते. नुकतीच त्यांनी दीड कोटी रुपयांची आलिशान कार खरेदी केली आहे. सशस्त्र हल्लेखोरांनी सिंग यांच्या कारच्या नोंदणी प्रमाणपत्राची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार सुरू केला.

हेही वाचा..

मुरादाबाद बलात्कार प्रकरण; आरोपी शाहनवाजच्या कुटुंबाचे ३ मदरसे सील !

पंतप्रधान मोदी, योगींचे कौतुक केल्यामुळे मुस्लीम महिलेला पतीकडून ‘तिहेरी तलाक’

नालासोपार्‍यात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

आसाम गँगरेप: मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला, तलावात उडी मारून मृत्यू

सिंग यांच्या कुटुंबीयांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सिंग यांच्या पहिल्या पत्नीच्या कुटुंबाचा या हल्ल्यामागे हात असल्याचा दावा त्यांच्या आईने केला आहे. सरकारने अमृतसरच्या पोलीस आयुक्तांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्यास सांगितले आहे. सुखचैन सिंगच्या कुटुंबाने त्यांच्या आधीच्या पत्नीच्या कुटुंबातील पाच सदस्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे, असे एएनआयने वृत्त दिले आहे.

पोलिसांनी सिंग यांच्या निवासस्थानातील सर्व सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत आणि या घटनेचा तपास सुरू केला आहे. मंत्री कुलदीप एस धालीवाल यांनी ही घटना वैयक्तिक वादातून घडली असावी, असे संकेत दिले. हा मुद्दा वैयक्तिक आहे की नाही याची आम्ही पडताळणी करत आहोत. आजकाल अनिवासी भारतीयांशी संबंधित मालमत्ता आणि इतर वैयक्तिक वाद प्रचलित आहेत. कालही मी लुधियानामध्ये असाच एक प्रश्न सोडवला. माझे अनिवासी भारतीयांना आवाहन आहे की, अशा कोणत्याही वैयक्तिक समस्या एकत्र बसून सोडवाव्यात. असे धालीवाल म्हणाले.

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल म्हणाले की, पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. एकस्वर मुख्यमंत्री भगवंत मान यांना टॅग करत बादल म्हणाले, तुमच्या राज्यात दररोज अशा घटना घडत आहेत. पंजाबी त्यांच्या घरातही सुरक्षित नाहीत. मला वाटते तुम्ही नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा.

माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल म्हणाल्या की, सुखचैन सिंग यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने पंजाब हादरला आहे. तुम्ही (भगवंत मान) आणि तुमचे कुटुंबीय बुलेट प्रूफ वाहनांत फिरता. पण पंजाबींचे संरक्षण कोण करणार ? पंजाबमध्ये खंडणी, तुरुंगात गुंडांच्या मुलाखती, धमक्या आणि खून हे सामान्य झाले आहेत, हरसिमरत म्हणाल्या.

भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितले की, या घटनेमुळे मला खूप दुःख झाले आहे आणि धक्का बसला आहे. पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था नाही असे दिसते. भगवंत मान यांचा रंगला पंजाब हा फक्त एक संवाद आहे, असे सिरसा म्हणाले. काँग्रेसचे पंजाबचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग म्हणाले की, अनिवासी भारतीय एकेकाळी अभिमानाने पंजाबला आपले घर म्हणत, पण आता ते भीतीने जगत आहेत. आप सरकारच्या अक्षमतेमुळे पंजाब धोक्याचा प्रदेश बनला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा