27 C
Mumbai
Sunday, September 15, 2024
घरविशेषआसाम गँगरेप: मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला, तलावात उडी मारून मृत्यू

आसाम गँगरेप: मुख्य आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला, तलावात उडी मारून मृत्यू

अन्य दोन आरोपींचा शोध सुरु

Google News Follow

Related

आसाममधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचा शनिवारी (ऑगस्ट) तलावात उडी मारल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा घडल्या त्या ठिकाणी आरोपीला शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास नेत असताना आरोपीने पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि नागाव येथील तलावात उडी मारली अन त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

तफाझुल इस्लाम असे मृत आरोपीचे नाव आहे. तफाझुल इस्लाम हा आसाममधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी होतो. एसपी नागाव स्वप्नील डेका यांनी सांगितले की, ‘जेव्हा पोलिसांचे पथक शनिवारी पहाटे आरोपीला घटनास्थळी तपासासाठी घेऊन गेले, तेव्हा मुख्य आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळाजवळ असलेल्या तलावात उडी मारली.

हे ही वाचा :

‘गब्बर’चा क्रिकेटला अलविदा!

नेपाळ बस अपघातात महाराष्ट्रातील २४ पर्यटकांचा मृत्यू; वायुसेनेच्या विमानाने मृतदेह राज्यात आणणार

भायखळ्यात घरात घुसलेल्या माथेफिरूकडून दोन मुलावर चाकू हल्ला

मुंबईत बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती?, एकानेच केला दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

 

ते पुढे म्हणाले की,  पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले, तलावात शोध मोहीम सुरु केली आणि दोन तासांनंतर आरोपीचा मृतदेह सापडला. आरोपी पोलिसांच्या तावडीतून पलायन करत असताना यावेळी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, गँगरेपमध्ये सहभागी असलेल्या तीन पुरुषांपैकी इस्लाम हा एक होता.

गँगरेपची ही घटना गुरुवारी (२२ ऑगस्ट) सायंकाळी नागाव जिल्ह्यात घडली. १४ वर्षीय मुलगी शिकवणीवरून घरी येत असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी तिला पकडले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला बेशुद्ध करून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. स्थानिकांनी मुलगीचा शोध घेवून पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी तफाझुल इस्लामला अटक केले होते आणि अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, पिडीत मुलीवर  सध्या नागाव जिल्ह्यातील वैद्यकीय युनिटमध्ये उपचार सुरू आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा