31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषओदिशातील अपघाताप्रमाणेच देशात अनेक अपघातांनी उडविली होती झोप

ओदिशातील अपघाताप्रमाणेच देशात अनेक अपघातांनी उडविली होती झोप

Google News Follow

Related

आसाममध्ये दोन रेल्वेगाड्यांच्या धडकेत आतापर्यंत सुमारे २८० जणांचा मृत्यू तर ९००हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रेल्वे अपघातानंतर राष्ट्रीय आपत्कालीन बचाव दलाची नऊ पथके बचावकार्यात सहभागी झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांत झालेल्या रेल्वेअपघातांवर नजर टाकूया.

जून १९८१- बिहारमध्ये ६ जून १९८१ रोजी मानसी आणि सहरसा स्थानकांदरम्यान असणारा पूल ओलांडत असताना रेल्वे रुळांवरून घसरून तिचे सात डबे बागमती नदीमध्ये कोसळले होते. या अपघातात ८०० प्रवाशांचा अंत झाला होता. आतापर्यंत देशात आणि जगभरात मानला जाणारा सर्वांत भयानक अपघात म्हणून याची नोंद केली जाते.

ऑगस्ट १९९५- दिल्ली ते कानपूर धावणारी पुरुषोत्तम एक्स्प्रेस उत्तर प्रदेशातील फिरोजाबादच्या जवळ उभ्या असलेल्या कालिंदी एक्स्प्रेसला धडकली होती. या अपघातात दोन्ही रेल्वेगाड्यांमधील सुमारे ३६०हून अधिक प्रवासी ठार झाले होते. काही प्रसारमाध्यमांनी या अपघाताला मानवी चूक कारणीभूत असल्याचे म्हटले होते. रेल्वेरुळांवर एका प्राण्याला धडक दिल्याने कालिंदी एक्स्प्रेसचे ब्रेक बंद पडले. त्यामुळे ही एक्स्प्रेस रेल्वेरुळांवर थांबली. त्याचवेळी पुरुषोत्तम एक्स्प्रेसलाही त्याच रुळांवरून धावण्याचा सिग्नल दिला गेला. पुरुषोत्तम एक्स्प्रेसने कालिंदी एक्स्प्रेसला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला.

हे ही वाचा:

अमित शहांनी इशारा दिल्यानंतर मणिपूरचे बंडखोर आले शरण, १४० शस्त्रे परत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओदिशात जाऊन घेतला अपघातस्थळाचा आढावा

ओदिशा अपघातातील पीडितांना वाचविण्यासाठी १४ तासांचा अथक संघर्ष

ओदिशात कोरोमंडल एक्स्प्रेसला भीषण अपघात; शेकडो लोक जखमी, ५० दगावल्याची भीती

२६ नोव्हेंबर १९९८ – जम्मू तावी-सियालदह एक्स्प्रेस ही पंजाब खन्नामध्ये अमृतसरला जाणाऱ्या फ्रंटिअर गोल्डन टेम्पल मेलला धडकली होती. रेल्वेरुळ तुटलेले असल्याने सुवर्ण मंदिर एक्स्प्रेसचे तीन डबे रुळांवरून घसरले. त्यात जम्मू तावी-सियालदह एक्स्प्रेसचे सहा डबे रुळांवरून घसरले. या भीषण अपघातात २८० प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

 

२८ मे २०१०- मुंबईला जाणारी हावडा कुर्ला लोकमान्य टिळक ज्ञानेश्वरी सुपर डिलक्स एक्स्प्रेस पश्चिम बंगालमधील पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील खेमशौली आणि साडिहा दरम्यान रात्री दीड वाजता रेल्वेरुळांवरून घसरली होती. त्यानंतर एका मालगाडीने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात २३५ जण ठार झाले होते.

 

९ सप्टेंबर २००२- हावडा-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस गया आणि डेहरी-ऑन-सोन स्थानकांदरम्यान रफी गंज स्थानकादरम्यान रेल्वेरुळांवरून घसरली होती. मानवी चुकीमुळे ही घटना घडली होती. त्यामध्ये १३० हून अधिक जण मारले गेले होते. असे मानले जाते की, तो रेल्वेरुळ ब्रिटिशकालीन होता. जोरदार पावसामुळे रेल्वेरुळांमध्ये भेगा पडल्या होत्या.

 

२ ऑगस्ट १९९९- अवध येथे अवध-आसाम एक्स्प्रेस आणि ब्रह्मपुत्र मेलमध्ये झालेल्या टक्करीत २६८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातात ३५९हून अधिकजण जखमी झाले होते. ब्रह्मपुत्र मेलमधून भारतीय सैनिकांना आसामच्या सीमेकडे नेले जात होते. त्याचवेळी अवध-आसाम एक्स्प्रेस गुवाहाटीला जात होती. ही ट्रेन गुस्लरच्या जवळ एका स्थानकावर थांबली होती. सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने ब्रह्मपुत्र मेलला त्याच रुळांवर पुढे जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला गेला. त्यानंतर दीड वाजता अवध-आसाम एक्स्प्रेसने समोरून या ट्रेनला धडक दिली.

 

ऑक्टोबर २००५ – आंध्र प्रदेशातील वेलुगोंडाच्या जवळ एका पॅसेंजर ट्रेनचे काही डबे रुळांवरून घसरले होते. या अपघातात किमान ७७ प्रवासी मृत्युमुखी पडले होते.

जुलै २०११- फतेहपूरमध्ये एक एक्स्प्रेस ट्रेन रुळांवरून घसरून ७० जणांचा मृत्यू झाला होता. त्यात ३००हून अधिक जण जखमी झाले होते.

नोव्हेंबर २०१६ – उत्तर प्रदेशात एक एक्स्प्रेस ट्रेन रुळांवरून घसरल्याने १४० जण ठार झाले होते तर, २००हून अधिक जण जखमी झाले होते.

जानेवारी २०१७ – आंध्र प्रदेशात एका पॅसेंजर ट्रेनचे काही डबे रुळांवरून घसरल्याने ४१ जणांचा मृत्यू झाला होता.
ऑक्टोबर २०१८ – अमृतरसमध्ये रेल्वेरुळांवर जमलेल्या जमावाला रेल्वेने चिरडले होते. त्यात ५९ जण मृत्युमुखी पडले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा