29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरविशेषसुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन

सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन

८० व्या वर्षी प्राणज्योत मालवली

Google News Follow

Related

सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. नवी दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलभ इंटरनॅशनलच्या मध्यवर्ती कार्यालयात ध्वजारोहणानंतर त्यांची तब्येत अचानक खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ८० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

सुलभ इंटरनॅशनलच्या कार्यालयात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले.

बिंदेश्वर पाठक यांचे देशातील स्वच्छता मोहिमेत मोठे योगदान राहिले आहे. सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनची स्थापना बिंदेश्वर पाठक यांनी १९७० मध्ये केली होती सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी पाच दशकांहून अधिक काळ चाललेली राष्ट्रव्यापी स्वच्छता चळवळ उभारण्यासाठी आपले जीवन समर्पित केले होते. त्यांच्या पुढाकारामुळे ठिकठिकाणी सुलभ शौचालयाचे बांधकाम शक्य झाले होते.

तीन दशकांपूर्वी डिझाइन केलेल्या सुलभ टॉयलेटला किण्वन संयंत्रांशी जोडून त्यांनी बायोगॅस निर्मितीचा अभिनव प्रयोग केला. स्वच्छता या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

हे ही वाचा:

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे कार्य करू!

भारतीय वंशाच्या निशा अमेरिकी वित्तसंस्थेच्या महत्त्वाच्या पदावर

अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व बहाल !

मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. “डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे निधन हे आपल्या देशाचे मोठे नुकसान आहे. ते एक दूरदर्शी होते, ज्यांनी सामाजिक प्रगतीसाठी आणि दलितांच्या सशक्तीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर कार्य केले. बिंदेश्वरजींनी स्वच्छ भारत घडवणे हे त्यांचे ध्येय बनवले. स्वच्छ भारत मिशनसाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले. आमच्या विविध संभाषणांमध्ये स्वच्छतेबद्दलची त्यांची तळमळ नेहमीच दिसून आली,” असं त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा