31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरविशेष'राहुल गांधी लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधतात पण त्यातील पाने मात्र कोरी'

‘राहुल गांधी लाल पुस्तकाला संविधान म्हणून संबोधतात पण त्यातील पाने मात्र कोरी’

भाजपकडून व्हिडिओ ट्विट

Google News Follow

Related

काँग्रेस नेते राहुल गांधी आज (६ नोव्हेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर होते. नागपूरच्या रेशीमबागेत आयोजन करण्यात आलेल्या संविधान संमेलनात राहुल गांधींची प्रमुख उपस्थिती होती. राहुल गांधीनी संमेलनाला संबोधित करताना संविधानाचा दाखला देत सरकारवर टीका केली. यावेळी त्यांच्या हातामध्ये लाल रंगाचे पुस्तक होते, ज्याला संविधान म्हणून संबोधले गेले. मात्र, ते लाल पुस्तक संविधान नसून त्यातील पाने मात्र कोरी असल्याचा दावा भाजपाने केला आहे. यासंदर्भात भाजपाने व्हिडीओही ट्वीटकेले आहे, ज्यामध्ये लाल रंगाच्या पुस्तकातील पाने ही कोरी असल्याचे दिसून येत आहे.

भाजपाने ट्वीटकरत म्हटले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा भाजपकडून निषेध. आरक्षण विरोधी @INCIndia ची ही संविधान संपवण्याची पहिली पायरी तर नाही ना ?, असा सवाल भाजपाने उपस्थित केला. पुढे म्हटले, ‘संविधान सिर्फ बहाना है, लाल पुस्तक को बढ़ाना है, मोहब्बत के नाम पर
सिर्फ नफरत फैलाना है…’ काँग्रेसला भारताचे संविधान असेच कोरे करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे अनुच्छेद वगळून टाकायचे आहेत. म्हणूनच तर राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती.

हे ही वाचा : 

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांनी फडकवला विजयाचा झेंडा

पवारांची यादी अकबरला मिळाली, अमरच्या यादीचे काय?

‘पीएम विद्यालक्ष्मी’च्या मदतीने विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार होणार

जम्मू-काश्मीरमध्येही चालणार बुलडोझर, दहशतवाद्यांना आश्रय दिला तर घरे होणार जमीनदोस्त!

राहुल गांधी यांनी लक्षात ठेवा, श्रध्देय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर भारताचा आणि भारतीयांच्या जगण्याचा पाया आहे. त्यामुळे संविधान विरोधी कॉग्रेसला जनताच धडा शिकवेल. ‘संविधानाच्या मारतात बाता, काँग्रेसचा एकूण विषयच खोटा,’ असे भाजपाने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा