32 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषमुंबईत ३३ हजार खड्डे बुजवल्यानंतरही रस्त्यांची चाळणच!

मुंबईत ३३ हजार खड्डे बुजवल्यानंतरही रस्त्यांची चाळणच!

Google News Follow

Related

मागच्या आठवड्यात मुंबईतील रस्त्यांवरचे ३३ हजार खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने केला होता. मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची स्थिती खूप वेगळी आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे आहेत. स्थानिक, प्रवासी आणि लोकप्रतिनिधींनी अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवरील खड्ड्यांविषयी वारंवार तक्रार केल्या आहेत. मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांपैकी एक असलेला जोगेश्वरी- विक्रोळी लिंकरोडवरील खड्ड्यांच्या अनेक वाहन चालकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच नाहूर स्थानकाजवळील गोरेगाव- मुलुंड लिंक रोड आणि पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे, अशा तक्रारीही करण्यात आल्या आहेत.

दहिसर चेकनाका जवळील मार्गाची अवस्थाही दयनीय झाली आहे. रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्याच्या कोणत्या भागातून वाहन चालवल्यास सुरक्षित असेल, असा प्रश्न पडतो, असे दहिसर चेकनाक्यावरून रोज प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले. त्याहून ही वाईट अवस्था चेक नाक्याच्या मीरा- भाईंदरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असल्याचे एका वाहतूक पोलिसाने सांगितले. लोखंडवाला सर्कल ते चार बंगला या मार्गावर खूप खड्डे आहेत. अनेक चालकांनी या महत्वाच्या मार्गांवरी खड्ड्यांचे फोटो समाज माध्यमांवर टाकून आपला संताप व्यक्त केला आहे. अंधेरी ते दक्षिण मुंबई असा रोज सायकल प्रवास करणाऱ्या सायकलस्वाराने सांगितले की, रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडी एकाच वेळी टाळत सायकल चालवणे अत्यंत धोकादायक आहे.

हे ही वाचा:

कौतुकास्पद! भारतीय दिव्यांग पोहोचले सियाचीन शिखरावर!

शिया मुसलमानांवर अन्याय होत असल्याने इराण तालिबानवर नाराज?

लवकरच कंगना दिसणार सीता मैय्याच्या भूमिकेत

कांदिवलीतली १६ वर्षीय मुलगी हैदराबादेत कशी सापडली?

मागच्या आठवड्यात पालिकेने गेल्या पाच महिन्यांत (११ सप्टेंबरपर्यंत) ३३ हजार १५६ खड्डे भरले असे सांगितले. भाजपचे गटनेते विनोद मिश्रा यांनी ३५० कोटी खड्डे बुजवण्यासाठी खर्च झाल्याचे सांगितले. मात्र तरीही शहरातल्या सर्व महत्त्वाच्या मार्गांवर अजूनही खड्डे आहेत. मुंबईतील दोन हजार किलोमीटर रस्त्यांची देखभाल पालिका करते. सहा मीटरपेक्षा मोठे असलेल्या रस्त्यांचे आता काँक्रिटीकरण करण्यात येणार असून त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत. पालिकेने विभागानुसार गट बनवले असून त्यांच्यामार्फत खड्डे बुजवण्याचे काम केले जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा