28 C
Mumbai
Sunday, October 17, 2021
घरविशेषबीकेसीमध्ये 'हा' पूल कोसळला

बीकेसीमध्ये ‘हा’ पूल कोसळला

Related

मुंबईच्या बीकेसी परिसरात शुक्रवारी पहाटे उड्डाणपूल कोसळल्याची दुर्घटना घडली. हा पूल निर्माणाधीन होता. उड्डाणपूलाचे काम सुरु असल्यामुळे नेहमीप्रमाणे काही मजूर पूलावर होते. मात्र, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक हा पूल पडायला सुरुवात झाली. हा अपघात झाला तेव्हा पूलावर तब्बल २० ते २५ मजूर काम करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा बीकेसी परिसरात एमएमआरडीएच्या पुलाचं काम सुरु होतं. पहाटे साडेचारच्या सुमारास पूल कोसळला. त्यावेळी या पुलावर २२ ते २४ कामगार काम करत होते. पूल कोसळला त्यावेळी काही कामगारांनी घाबरुन पाण्याच्या टाकीत उडी मारली, तर काहींनी पुलाला असलेल्या सळईला पकडून लटकले. तर या पूल दुर्घटनेत १३ ते १४ जण अडकून जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्याच व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा:

तिरुपती देवस्थान समितीवर मिलिंद नार्वेकर कसे चालतात?

काळजी घेणाऱ्या इसमामुळेच ते कुटुंबीय पडले काळजीत; काय घडले?

ब्रम्हांडातील बेस्ट मुख्यमंत्र्यांचे नाव प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नाही?

वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा टी-२० कर्णधार

काही दिवसांपूर्वी नवीन कोपरी पूल वापरण्यापूर्वीच त्याला तडे गेल्याने वाद निर्माण झाला होता. पूर्व द्रुतगती महामार्गावरी वाहतूक कोंडीतून नागरिकांची, प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी कोपरी येथे नवीन पुल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यापैकी २ लेनचे काम पूर्ण झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,436अनुयायीअनुकरण करा
4,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा