पंजाबमधील अमृतसर येथे भारत-पाकिस्तान सीमेवर भरोपाल गावाजवळ सुरक्षा दलांनी मोठे दहशतवादी कटकारस्थान उधळून लावले आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पंजाब पोलिसांनी संयुक्त ऑपरेशनमध्ये शस्त्रसाठा जप्त केला असून दोन हँड ग्रेनेड्सही ताब्यात घेतले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ग्रेनेड्सचा वापर दहशतवादी हल्ल्यांसाठी केला जाणार होता. बीएसएफ आणि पंजाब पोलिसांच्या संयुक्त पथकाने भरोपाल गाव परिसरात शोधमोहीम राबवली. तलाशीदरम्यान जमिनीत लपवून ठेवलेले दोन हँड ग्रेनेड, तीन पिस्तुलं, सहा मॅगझिन आणि ५० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
त्याआधी, २७ एप्रिलला पंजाब पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स युनिटने अमृतसरमध्ये एक मोठा बेकायदेशीर शस्त्र तस्करीचा मॉड्यूल उघड केला होता. खुफिया माहितीच्या आधारे पोलिसांनी अमृतसर जिल्ह्याच्या अभिषेक कुमारला अटक केली होती. त्याच्याकडून ७ पिस्तुलं, ४ काडतुसे आणि १.५ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले होते. हे मॉड्यूल पाकिस्तानशी संबंधित होतं आणि भारत-पाक सीमा ओलांडून शस्त्रांची तस्करी करत होतं. २६ एप्रिलला बीएसएफने पंजाबमध्ये सीमा पारून होणाऱ्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत हेरॉईन, शस्त्रं आणि एक ड्रोन जप्त केला होता. या मोहिमेदरम्यान १.९३५ किलो संशयास्पद हेरॉईन, एक पिस्तूल, एक मॅगझिन आणि DJI Mavic 3 Classic ड्रोन जप्त करण्यात आला होता. ही कारवाई खुफिया माहिती आणि त्वरित प्रतिसादावर आधारित होती, ज्यामुळे तस्करांचे मनसुबे फसले.
हेही वाचा..
फौजिया बेगमने ३० वर्षांनी केले जन्मप्रमाणपत्र, सोमय्यांनी केली पोलखोल
जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर हाफिज सईदला चार पट सुरक्षा, पाक सैन्य तैनात!
भारताने पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र केले बंद, परिणाम काय?
आम्ही सज्ज! शत्रूला INS सूरतच्या कमांडिंग ऑफिसरचा इशारा
यापूर्वी, २२ एप्रिलला काउंटर इंटेलिजन्स (अमृतसर) विभागाने अमेरिकेशी संबंधित बेकायदेशीर शस्त्र तस्करी मॉड्यूल उघड करत लुधियानामधून गुरविंदर सिंग उर्फ गुरी याला अटक केली होती. त्याच्याकडून ५ बेकायदेशीर पिस्तुलं जप्त करण्यात आली होती.







