32 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरविशेषसीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर, निकालात मुलींची बाजी

सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर, निकालात मुलींची बाजी

बारावीमध्ये ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Google News Follow

Related

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षी बारावीमध्ये ८७.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावी सीबीएसई निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे.

बारावी परीक्षेत ९०.६८ टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८४.६७ टक्के इतकी आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांच्या तुलनेत तब्बल सहा टक्क्यांनी जास्त आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घट झाल्याचे चित्र आहे. मागील वर्षी सीबीएसई बोर्डात ९१.२५ टक्के मुले उत्तीर्ण झाली होती, तर यावर्षी फक्त ८४.६७ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत आणि गेल्या वर्षी ९४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या. यावर्षी या आकडेवारीत घाट होऊन ९०.६८ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

या वर्षी दहावी आणि बारावीचे एकूण ३८ लाख ८३ हजार ७१० विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होते. यात २१ लाख ८६ हजार ९४० दहावीचे विद्यार्थी होते. तर, बारावीचे १६ लाख ९६ हजार ७७० विद्यार्थी होते.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे अजूनही स्वतःच्या राजीनाम्याच्या प्रेमात

इम्रान खान यांच्या पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डॉ. शिरीन मजारी यांना अटक

कायदा सुव्यवस्था बिघडेल म्हणून चित्रपट न दाखवणे पूर्णतः अयोग्य

एलन मस्क ‘ट्विटर’च्या सीईओपदाचा राजीनामा देणार

सीबीएसईची इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरु झाली होती. या परीक्षेचा निकाल cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन पाहता येऊ शकेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा