31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेष२२ जानेवारीला घराघरात दिवे लावा! दिवाळी साजरी करा!

२२ जानेवारीला घराघरात दिवे लावा! दिवाळी साजरी करा!

पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार ३० डिसेंबर रोजी अयोध्येचा दौरा केला.यावेळी त्यांनी अयोध्येतील ‘अयोध्याधाम रेल्वे स्थानकाचे’ आणि ‘महर्षी वाल्मिकी विमानतळाचे’ उद्घाटन केले.तसेच अमृत भारत रेल्वे आणि वंदे भारत रेल्वेला हिरवा कंदील दाखवला.या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी संवाद साधत देशवासियांना दोन विशेष आवाहन केले.पहिल्या आवाहनात त्यांनी सर्व देशवासियांना सांगितले की, २२ जानेवारीला अयोध्येत न येण्याचे आवाहन केले.तर २२ जानेवारी रोजी सर्व देशवासीयांनी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले.

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.सोहळ्यासाठी देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साह आहे. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लोक अयोध्येत पोहोचत आहेत. जिल्ह्यातील सर्व हॉटेल आणि गेस्ट हाऊस आधीच फुल्ल झाली आहेत. रेल्वे आणि बसची तिकिटेही बुक झाली आहेत. गर्दी पाहता प्रशासनाकडूनही लोकांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच क्रमाने आता पीएम मोदींनीही जनतेला आवाहन केले आहे.

अयोध्येतील भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्या सर्व देशवासियांना माझी आणखी एक विनंती आहे. २२ जानेवारीला होणार्‍या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकाला स्वतः अयोध्येत येण्याची इच्छा आहे, परंतु तुम्हाला हे देखील माहित आहे की प्रत्येकाला येणे शक्य नाही. प्रत्येकासाठी अयोध्येला पोहोचणे खूप अवघड आहे आणि म्हणून मी सर्व राम भक्तांना, देशभरातील राम भक्तांना आणि उत्तर प्रदेशातील राम भक्तांना हात जोडून प्रणाम करून सांगतो की, सर्वांनी २२ तारखेलाच यायला पाहिजे असे काही नाही आहे.

हे ही वाचा:

दहशतवादी हाफिज सईदच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान सरसावले!

नौदल अधिकाऱ्यांच्या वर्दीवर शिवमुद्रा; नवे स्कंधचिन्ह जाहीर!

‘इस्रायल-हमासचे युद्ध पंतप्रधान मोदीच थांबवू शकतात’

उत्तर मेक्सिकोमध्ये पार्टीत बंदुकधाऱ्यांच्या हल्ल्यात सहा ठार

ते पुढे म्हणाले की, माझी विनंती आहे की, २२ जानेवारीला सोहळ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी २३ तारखेनंतर आपल्या सोयीनुसार अयोध्येला यावे. २२ तारखेला अयोध्येला यायचे ठरवू नका.सुरक्षेच्या कारणास्तव मोदी म्हणाले की, आम्ही भक्त प्रभू रामजींना कधीही त्रास देऊ शकत नाही.भगवान प्रभू राम येत आहेत म्हणून आपणही थोडे दिवस वाट पाहू या.जर तुम्ही ५५० वर्षे वाट पहिली तर अजून थोडे दिवस वाट पाहू.

‘संपूर्ण जग २२ जानेवारीची वाट पाहत आहे’
आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याचा उल्लेख करताना म्हटले, ‘आज संपूर्ण जग २२ जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशा स्थितीत अयोध्येतील जनतेमध्ये कमालीचा उत्साह असणे स्वाभाविक आहे. मी भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि भारतातील प्रत्येक माणसाचा पूजक आहे. मीही तुमच्यासारखाच उत्सुक आहे. आम्हा सर्वांचा हा जल्लोष आणि उत्साह अयोध्येच्या रस्त्यांवर पूर्णपणे दिसत होता. जणू काही अयोध्या नगरी रस्त्यावर आली आहे. या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘प्रभू श्री राम चंद्र की जय’ अशा घोषणाही दिल्या.

प्रभू रामजी सोबत चार कोटी लोकांनाही मिळाली पक्की घरं
पंतप्रधान मोदी म्हणाले की, एक वेळ अशी होती की अयोध्येमध्ये रामलल्ला तंबूत राहत होते. आता प्रभू रामांना देखील पक्के घर मिळाले आहे.पण फक्त रामांनाच नाही तर देशातील चार कोटी गरीब जनतेला देखील पक्की घरं मिळाली आहेत.

अयोध्या धाम स्थानकातून दररोज ६० हजार लोक करणार प्रवास
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाची एकूण क्षमता १०-१५ हजार लोकांना सेवा देण्याची आहे. मात्र, रेल्वे स्थानक पूर्ण विकसित झाल्यावर येथून दररोज ६० हजार लोकांना प्रवास करता येणार आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

अयोध्येला स्मार्ट बनवणार
पंतप्रधान मोदींनी अयोध्येमधील विविध विकास कामांचे यावेळी लोकार्पण केले.ते पुढे म्हणाले की, आज मला अयोध्या धाम विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करण्याचं सौभाग्य मिळालं आहे. मला आनंद होतोय की अयोध्या विमानतळाचं नाव हे महर्षि वाल्मिकी यांच्यावरुन ठेवण्यात आले. या ठिकाणी श्री रामाचे भव्य मंदिर उभारल्यानंतर भाविकांची येथे वर्दळ वाढणार आहे.याच दृष्टिकोनाने आमचे सरकार अयोध्येत हजारो कोटी रुपयांची विकासकामे करत आहे आणि अयोध्येला स्मार्ट बनवत आहे, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

मकर संक्रांतीपासून प्रत्येक मंदिरात राबवली जाणार स्वच्छता मोहीम
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात अयोध्या स्वच्छ करण्याची विनंती केली.देशभरातून आणि जगभरातून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज राहण्याचे आवाहन अयोध्येतील जनतेला केले.पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी देशातील सर्व तीर्थक्षेत्रे आणि मंदिरांना विनंती करतो की, भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवसापासून संपूर्ण देशातील सर्व जनतेने तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता मोहीम राबवावी. १४ जानेवारी ते २२ जानेवारी या कालावधीत प्रत्येक मंदिरात स्वच्छता मोहीम राबवायची आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

दरम्यान, अयोध्येत २२ जानेवारीला प्राण प्रतिष्ठेचा सोहळा दिमाखात पार पडणार आहे.पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिर अभिषेक सोहळा होणार आहे.अभिषेक सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने लोक अयोध्येत अपेक्षा वर्तवली जात आहे.या सोहळ्यासाठी अयोध्या शहर सजले आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा