राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्या नातवंडांसोबत हॅलोविन साजरा केल्याचा व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर समोर आल्यानंतर त्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने तीव्र टीका केली आहे. भाजपने बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांवर ढोंगीपणाचा आरोप केला आणि त्यांनी यापूर्वी महाकुंभ उत्सवाला “अर्थहीन” म्हटले होते असे निदर्शनास आणून दिले.
भाजपाच्या किसान मोर्चाने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बिहारच्या लोकांनो, विसरू नका, हे तेच लालू यादव आहेत ज्यांनी श्रद्धा आणि अध्यात्माच्या भव्य उत्सवाला निरुपयोगी म्हटले होते आणि आता ते हॅलोविनचा सण साजरा करत आहेत. श्रद्धेवर हल्ला करणाऱ्यांना बिहारच्या लोकांकडून मते मिळणार नाहीत.”
लालूंचा हा व्हिडीओ त्यांची कन्या आणि आरजेडी नेत्या रोहिणी आचार्य यांनी शेअर केले आहेत. त्यांनी कुटुंबाच्या हॅलोविन सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात कॅप्शन आहे, “सर्वांना हॅलोविनच्या शुभेच्छा.” या व्हिडिओमध्ये लालू यादव त्यांच्या नातवंडांसोबत पोशाख परिधान करून फोटो काढताना दिसत आहेत.
दरम्यान, या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रयागराजमधील महाकुंभ महोत्सवाला “फालतू'” (अर्थहीन) असे संबोधल्यानंतर लालूंनी वाद निर्माण केला होता. ‘कुंभ का कोई मतलब नहीं है, यह फालतू है’ ( कुंभ म्हणजे काय? कुंभ निरुपयोगी आहे) असे लालू यादव म्हणाले होते.
हे ही वाचा :
जन सुराज समर्थकाच्या हत्येप्रकरणी जेडीयू उमेदवार अनंत सिंहला अटक
आयुष्मान कार्ड साखळीचा पर्दाफाश; ३०० हून अधिक ओळखपत्रे जप्त!
ब्रिटनमध्ये रेल्वेत अनेकांना भोसकले, २ अटकेत
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. लालू यादव म्हणाले, चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दुर्दैवी असून पीडितांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या अपघाताला त्यांनी पूर्णपणे रेल्वेला जबाबदार धरले आणि म्हटले की रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळेच इतक्या लोकांना आपला जीव गमवावा लागला.
भूलना मत बिहार वासियों, यही लालू यादव है, जिसने आस्था और आध्यात्म के महाकुंभ को फालतू बताया था और अंग्रेजों का त्योहार Halloween मना रहा है।
जो आस्था पर करेगा चोट, बिहार वासी नहीं करेंगे उसको वोट।#ShameOnLaluYadav#BiharElection2025 pic.twitter.com/u1kquCg1gg
— BJP Kisan Morcha (@bjpkm4kisan) November 1, 2025
रेल्वेमंत्र्यांनी ही संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे. महाकुंभ मेळ्यात ज्या प्रमाणे गर्दी वाढत आहेत, तुमचे यावर काय मत आहे?, असा प्रश्न यादव यांना विचारण्यात आला. यावर लालू यादव म्हणाले, कुंभ म्हणजे काय?’ कुंभ निरुपयोगी आहे. या वक्तव्यानंतर भाजप आणि अनेक हिंदू धार्मिक नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.







