31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषयजुवेंद्र चहलचे ३५०, टी-२० क्रिकेटमधील पहिला भारतीय गोलंदाज

यजुवेंद्र चहलचे ३५०, टी-२० क्रिकेटमधील पहिला भारतीय गोलंदाज

दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यात ऋषभ पंतची विकेट घेतल्यावर केला विक्रम

Google News Follow

Related

जूनमध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झालेल्या यजुवेंद्र चहल याने मंगळवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर विक्रम केला. त्याने दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला बाद करून टी २० क्रिकेटमधील ३५०वी विकेट घेतली. टी २० क्रिकेटमध्ये ३५० विकेट घेणारा युझुवेंद्र हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

राजस्थान आणि दिल्ली यांच्यात सामना सुरू झाला, तेव्हा चहल याला हा विक्रम करण्यासाठी केवळ एका विकेटची आवश्यकता होती आणि पंतची विकेट घेऊन त्याने हा विक्रम केला. चहल याने आयपीएल कारकिर्दीत तिसऱ्यांदा पंत याला बाद केले आहे. चहल याने ३०१व्या सामन्यात ही कामगिरी केली. आता त्यामागोमाग मुंबईचा गोलंदाज पियुष चावला याचा क्रमांक आहे. त्याने आतापर्यंत ३१० विकेट घेतल्या आहेत. मात्र एकूण यादी पाहिल्यास तो ११व्या क्रमांकावर आहे.

हे ही वाचा:

शरियानुसार पेन्शन द्या, इस्रायलशी संबंध तोडा…मुस्लिम गटाच्या ब्रिटनमध्ये मागण्या

‘आसाममध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान’

नीरव मोदी याला ब्रिटनच्या न्यायालयाचा धक्का!

पॅलेस्टाईन समर्थक निदर्शकांनी अमेरिकेचा ध्वज जाळला!

या यादीत अव्वल स्थानी आहे, वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्हो. त्याने ५७४ सामन्यांत ६२५ विकेट घेतल्या आहेत. ३५० विकेट घेणारा चहल हा पाचवा फिरकीपटू असून सहावा आशियाई गोलंदाज आहे. या ३५० विकेटपैकी त्याने ९६ विकेट या भारतासाठी घेतल्या आहेत. तर, अन्य २०१ विकेट त्याने आयपीएलमध्ये मिळवल्या आहेत. चहल हा भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा फिरकीपटूदेखील आहे. त्याने सध्याच्या आयपीएल हंगामात १२ सामन्यांतून १४ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळेच त्याला टी २० वर्ल्डकप संघात स्थान मिळाले आहे.

दिल्लीने राजस्थानला २२२ धावांचे लक्ष्य दिले होते. त्यात १९ चेंडूंत अर्धशतक करणारा जेक फ्रेझर-मॅकगर्क, ६५ धावा करणारा अभिषेक पोरेल आणि २० चेंडूंत ४१ धावा करणाऱ्या ट्रिस्टान स्टब्ज यांची कामगिरी मोलाची ठरली. तर, रवीचंद्रन अश्विन याने २४ धावा देऊन तीन विकेट घेतल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा