31 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
घरविशेषचांद्रयान-3; विक्रम लँडरने पाठवला चंद्राचा व्हिडीओ !

चांद्रयान-3; विक्रम लँडरने पाठवला चंद्राचा व्हिडीओ !

लँडर आणि रोव्हर २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशाजवळ उतरण्याची अपेक्षा

Google News Follow

Related

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान-३ या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. १५ ऑगस्ट रोजी, अवकाशयानाने लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC) वापरून चंद्राच्या आकर्षक प्रतिमा घेतल्या. चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरने अवकाशातून चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो काढले असून ते इस्रोला पाठवले आहेत. हा व्हिडिओ शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये चंद्राचा पृष्ठभाग स्पष्टपणे दिसत आहे.

इस्रोचं ‘चांद्रयान-३’ आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. आज चांद्रयान-3 चंद्रापासून 30 किलोमीटर अंतरावर पोहोचलं आहे. यानंतर चांद्रयाननं चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो पाठवले आहेत. चंद्राचा पहिला फोटो समोर आला आहे, लँडर मॉड्यूलला प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केल्यानंतरचा आहे.विक्रम लँडर इमेजरमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेरा-१ ने १७ ऑगस्ट रोजी हा फोटो कैद केला आहे.१४ जुलै २०२३रोजी भारतातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केलेले चांद्रयान-३ ने ५ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.

हे ही वाचा:

दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब असल्याचा बनावट फोन

द्युती चंदवर चार वर्षांची बंदी, उत्तेजक चाचणीत ठरली दोषी

फुटिरतावादी यासिन मलिकची पत्नी पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारमध्ये

भारतीय नौदलाची INS विंध्यगिरी सज्ज; राष्ट्रपतींच्या हस्ते जलावतरण

या यानाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे, चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर सुरक्षितपणे उतरवणे आणि इन-सीटू रासायनिक विश्लेषण करणे हे आहे.२०१९ मध्ये चांद्रयान-२ च्या अयशस्वी लँडिंगच्या प्रयत्नानंतर हे मिशन आहे. इस्रो पुन्हा चार वर्षानंतर चंद्रावर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करणार आहे. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर तेथील माहिती गोळा करुन चंद्राची रहस्यं उलगडण्यास मदत होईल.

चांद्रयान-३ मध्ये विक्रम नावाचा लँडर आणि प्रज्ञान नावाचा रोव्हर आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी लँडर काम करेल, तर चंद्राच्या पृष्ठभागावर विविध वैज्ञानिक प्रयोग करण्याचे काम रोव्हरचे असेल.लँडर आणि रोव्हर २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशाजवळ उतरतील अशी अपेक्षा आहे.विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर म्हणजेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर त्यातून बाहेर येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरेल. चांद्रयान-२ च्या लँडरचा चंद्राच्या पृष्ठभागापासून २ किमी आधी संपर्क तुटला होता. चांद्रयान-३ चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यास भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरेल. त्यामुळे या मोहिमेकडे भारताप्रमाणे जगाचं लक्ष लागलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा