29 C
Mumbai
Monday, July 25, 2022
घरविशेषसरकारकडून ध्वज संहितेत बदल; राष्ट्रध्वज फडकावण्याचे नवीन नियम

सरकारकडून ध्वज संहितेत बदल; राष्ट्रध्वज फडकावण्याचे नवीन नियम

Related

केंद्र सरकारने देशाच्या ध्वजसंहितेत महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दिवसा आणि रात्रीही तिरंगा फडकवता येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत केंद्राने १३ ते १५ ऑगस्ट या काळामध्ये ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याची घोषणाही केली आहे.

शनिवार, २३ जुलै रोजी केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे. यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे महत्त्वाचे बदल आणि त्याची माहिती आता नागरिकांना तसेच सर्व शासकीय व खासगी कार्यालयांना देणे आवश्यक असणार आहे.

यापूर्वी केवळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकता येत होता. सूर्यास्तानंतर राष्ट्रध्वज फडकावण्यास परवानगी नव्हती. तसेच, मशीनने बनवलेले आणि पॉलिस्टर राष्ट्रध्वज लावण्याचीही परवानगी नव्हती. मात्र आता दिवसा आणि रात्री देखील तिरंगा फडकाविता येणार आहे. त्याचबरोबर पॉलिस्टरपासून तसेच मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजालाही वंदन करता येईल. यासाठी केंद्र सरकारने १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याची घोषणाही केली आहे. या योजनेसाठी भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला आहे.

हे ही वाचा:

जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत नीरज चोप्राची रौप्यपदकाला गवसणी

मविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस

दरम्यान, ध्वज संहितेत केलेले बदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व मंत्रालये आणि विभागांना पत्र पाठवले आहे. राष्ट्रध्वजाला वंदन करण्याचे नियम भारताच्या ‘ध्वज संहिता-२००२’ आणि ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा-१९७१’ अंतर्गत विहित केलेले आहेत. आता २००२ च्या ध्वज संहितेत सुधारणा करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,928चाहतेआवड दर्शवा
1,918अनुयायीअनुकरण करा
13,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा