24 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
घरविशेषस्तूपांचे शहर सांची होणार भारतातील पहिले ‘सौर शहर’

स्तूपांचे शहर सांची होणार भारतातील पहिले ‘सौर शहर’

Google News Follow

Related

ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात, सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेल्या स्तूपांसाठी प्रसिद्ध असलेले मध्य प्रदेशातील सांची शहर आता एकविसाव्या शतकातील सौर शहर म्हणून ओळखले जाणार आहे. नऊ हजार लोकसंख्येचे हे शहर भारतातील पहिले ‘सौर शहर’ होण्याच्या मार्गावर आहे.

सांची शहरात घरगुती आणि व्यावसायिक गरजांसाठी असलेला तीन मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प पूर्णपणे कार्यरत आहे तर, पाच मेगावॉट क्षमतेचा दुसरा प्रकल्प शेतीसंबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी बांधला जात आहे. सांची हे शहर कर्कवृत्तावर उष्ण कटिबंधावर वसलेले असल्यामुळे सौर उर्जेचा वापर करण्यासाठी आदर्शवत आहे. तीन मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या स्तूपाजवळ असून पाच हेक्टर जमिनीवर बांधण्यात आला आहे.
भौगोलिक परिस्थिती अनुकूल असली तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारणे हे अभियांत्रिकी आव्हानही होते. सौर ऊर्जेसाठी आवश्यक असलेली यंत्रणा येथील डोंगराच्या उताराला जणू गुंडाळण्यात आली आहे. सध्याच्या सौर ऊर्जा प्रकल्पांपेक्षा येथील शंकूसारखी रचना ही अद्वितीय आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, अन्य सौर ऊर्जा प्रकल्प हे सरकारी निधीच्या साह्याने उभे राहात असताना या प्रकल्पासाठी कोणताही थेट सरकारी निधी मिळालेला नाही, असे मध्य प्रदेशच्या उर्जा विकास निगमचे अधीक्षक अभियंता श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.

नर्मदा हायड्रोइलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि मध्य प्रदेश सरकार यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. या सौर ऊर्जेतून मिळणावी वीज मध्य प्रदेश वीज व्यवस्थापन कंपनी ३. ६ रुपये प्रति युनिट दराने विकेल. सौर दिव्यासारखी उपकरणे कंपन्यांच्या सीएसआर निधीतून विकत घेतली गेली आहेत.

हे ही वाचा:

आयआयटीचे संचालक म्हणतात मांसाहारामुळे हिमाचलमध्ये ढगफुटी

शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ महाराष्ट्रात परतणार

मोबाईल न दिल्यानं तरुणाची हत्या !

८ सप्टेंबरला काय होणार? धक्कातंत्राचा विरोधकांना धसका

प्रत्येक घरामध्ये कमी ऊर्जा वापरणारे पंखे आणि दिवे दिले जाणार आहेत. सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांना आणि रस्त्यावरील विक्रेत्यांनाही सौर दिवे दिले जातील. पालिकेच्या पाण्याच्या पंपांसाठीही सौरऊर्जेचा वापर केला जाणार असून, पथदिवे सौरऊर्जेवरच चालतील. सर्व सरकारी इमारतींच्या छतावर सौर यंत्रणा बसवली जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
130,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा