29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेष'धोकादायक इमारती'मुळे अकरावीचा प्रवेश बंद

‘धोकादायक इमारती’मुळे अकरावीचा प्रवेश बंद

Google News Follow

Related

इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी शुक्रवारी जाहीर झाली. मात्र मुलुंड पश्चिम येथील ‘ज्ञान सरिता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया’त सोमवारी प्रवेशासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची निराशा झाली.

महाविद्यालयाने प्रवेशद्वार बंद ठेवल्यामुळे अखेरच्या दिवशी विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होऊ शकले नाहीत. महाविद्यालयाच्या बाहेर इमारत धोकादायक आहे असा फलक लावण्यात आला आहे.

पहिली यादी शुक्रवारी जाहीर झाली तेव्हापासून विद्यार्थी ज्ञान सरिता कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी जात आहेत. शनिवारी जान्हवी धुरी ही विद्यार्थिनी महाविद्यालयात प्रवेश निश्चितीसाठी गेली असता तिच्याकडून ऑनलाईन प्रवेश मिळाल्याचे पत्रक घेण्यात आले; मात्र पुढील प्रक्रियेची माहिती देण्यात आली नाही. त्यानंतर सोमवारी विद्यार्थिनी पुन्हा महाविद्यालयात गेली असता तिला प्रवेश देण्यात आला नाही.

पालक विजय ओंबळे यांच्या मुलीने महाविद्यालयांच्या यादीत ज्ञान सरिता कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव पहिले टाकले होते आणि त्यानुसार तिला हे महाविद्यालय मिळाले; मात्र प्रवेश निश्चित होऊ शकला नाही. महाविद्यालयाची इमारत धोकादायक असल्याचा फलक लाऊन प्रवेशद्वार बंद करण्यात आले आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मुलीने याच महाविद्यालयाला प्रथम प्राधान्य दिले असल्यामुळे आता उर्वरित दोन्ही यादीत तिचे नाव वगळले जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

मुंबईला पुन्हा मुसळधार पावसाने झोडपले, पुन्हा जागोजागी तुंबई

…आणि अमेरीकेचं शेवटचं विमान काबुलमधून उडालं

भविष्यात पेट्रोल-डिझेल हद्दपार करा!

हाण ईडी

महाविद्यालयाने पालकांना अन्य एका शाळेत जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले होते. परंतु तिथेही त्यांना मदत मिळाली नाही. पहिल्या यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश निश्चित करण्याची शेवटची तारीख सोमवारी होती. महाविद्यालयाच्या मोबाईल आणि दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता तिथूनही कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. प्रशासकीय विभागातील सीमा काणे आणि तांत्रिक विभागातील सचिन वाघ यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.

अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची तयारी नसताना या महाविद्यालयाचा समावेश प्रवेश प्रक्रियेमध्ये कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाबाबत शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा