31 C
Mumbai
Monday, May 27, 2024
घरविशेषधक्कादायक! पुण्यातील ऑटो कंपनीला पुरवलेल्या समोशामध्ये कंडोम, गुटखा, दगड सापडले!

धक्कादायक! पुण्यातील ऑटो कंपनीला पुरवलेल्या समोशामध्ये कंडोम, गुटखा, दगड सापडले!

एकाला अटक, गुन्हा दाखल

Google News Follow

Related

पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील एका मोठ्या ऑटोमोबाईल कंपनीला पुरवण्यात आलेल्या समोस्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि दगड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी(९ एप्रिल) दिली आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये एका उपकंत्राटदार कंपनीच्या दोन कामगारांचा समावेश आहे. ज्यांना समोसे पुरवठ्याचे कंत्राट मिळाले होते.तसेच भेसळ केल्याप्रकरणी यापूर्वी कारवाई करण्यात आलेल्या अशा अन्य फर्मचे तीन भागीदार आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, यापूर्वी कारवाई झालेल्या तीन भागिदारांना त्यांचे कंत्राट गेल्याचा राग होता. त्यामुळे नवे कंत्राट मिळालेल्या पुरवठादाराला बदनाम करण्यासाठी हा त्यांनी डाव रचला आणि त्यांनी त्यांचे दोन कर्मचारी नव्या कंत्राटदाराकडे कामाला लावले होते.

“कॅटलिस्ट सर्व्हिस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्मकडे ऑटोमोबाईल कंपनीच्या कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ पुरविण्याचे कंत्राट आहे. या फर्मने मनोहर एंटरप्रायझेस नावाच्या दुसऱ्या उपकंत्राटदार कंपनीला समोसे पुरवण्याचे कंत्राट दिले होते. शनिवारी ऑटोमोबाईल कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना समोश्यामध्ये कंडोम, गुटखा आणि खडे सापडले,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

‘अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, होता आणि राहील’

अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू!

सौदी अरेबियाने काश्मीरबाबत भारताच्या भूमिकेचे केले समर्थन!

नेदरलँडवरून आला नुपूर शर्मा यांना फोन

या घटनेबाबत मनोहर एंटरप्रायझेसच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता, फिरोज शेख आणि विकी शेख या दोन कामगारांनी समोस्यांमध्ये कंडोम, गुटखा आणि दगड भरल्याचे आढळून आले, असे चिखली पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, या घटनेची दखल घेत आम्ही आरोपींवर आयपीसी कलम ३२८ (विषाद्वारे दुखापत करणे) आणि १२०B (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.दोन आरोपींनी आम्हाला सांगितले की ते एसआरए एंटरप्रायझेसचे कर्मचारी आहेत आणि त्यांच्या भागीदारांनी मनोहर एंटरप्रायझेस पुरवठा करत असलेल्या अन्नात भेसळ करण्यासाठी पाठवले होते”

यापूर्वी SRA एंटरप्रायझेस ऑटोमोबाईल कंपनीला अन्नपुरवठा करायची.त्यांनी पुरवलेल्या अन्नामध्ये मलमपट्टी आढळल्याने त्यांच्या सोबत कंपनीने करार रद्द केला गेला.या रागामुळे रहीम शेख, अझहर शेख आणि मजहर शेख या भागीदारांना मनोहर एंटरप्रायझेसची बाजारातील प्रतिष्ठा खराब करायची होती.त्यामुळे त्यांनी हे कृत्य केले.या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी संगितिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
156,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा