29 C
Mumbai
Thursday, January 22, 2026
घरविशेषसैफ अली खानवर हल्ला हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा न्यायालयात दावा!

सैफ अली खानवर हल्ला हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा न्यायालयात दावा!

 न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

Google News Follow

Related

सैफ अली खानवर हल्ला करणारा मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या संशयित बांगलादेशी नागरिकाला मुंबई पोलिसांनी रविवारी सकाळी अटक करून दुपारी वांद्रे सुट्टीकालीन न्यायालयात हजर केले होते.न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सैफ अली वर झालेला हल्ला हा आंतरराष्ट्रीय कट असल्याचा संशय सरकारी वकील यांनी न्यायालयात व्यक्त केला असून या संशयित बांगलादेशी नागरिकाला भारतात आणण्यासाठी मदत करणाऱ्या एजंटचा शोध घ्यायचा असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात म्हटले आहे, मात्र आरोपीचे वकील संदीप शेरखान यांनी सरकारी वकील यांचे सर्व दावे फेटाळून लावत आरोपी हा मागील ७ वर्षांपासून मुंबईत राहत होता व तो बांगलादेशी असल्याचे कुठलेही पुरावे पोलिसांना सापडले नसल्याचे आरोपीचे वकील शेरखान यांनी न्यायालयात म्हटले आहे.

मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद (३३) या संशयित बांगलादेशी नागरिकाला सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ठाण्यातील कासारवडवली येथून हिरामदानी इस्टेट घोडबंदर रोड येथील लेबर कँप येथून अटक केली आहे.मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा मूळचा बांगलादेश मधील झलोकाठी जिल्हयातील राजबरीया गावातील राहणारा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आरोपी हा ६ महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता, आणि वरळी कोळीवाडा येथे एका हाऊसकीपिंग कपनित तो काम करीत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशातुन डोंगर पर्वत मार्गाने भारतात आला असून त्यासाठी त्याने एजंटला ५ हजार रुपये दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.रविवारी आरोपीला अटक करण्यात आली असून दुपारी त्याला वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले होते, आरोपीचे वकीलपत्र घेण्यासाठी दोन वकीलामध्ये रस्सीखेच सुरू होती, न्यायालयाने दोन्ही वकिलांनी आरोपीची बाजू मांडण्यास परवानगी दिली.

हे ही वाचा : 

बंगाल सरकारकडून अनेक बांगलादेशींची भारतात तस्करी!

दुचाकी क्रमांक आणि चेहरा ओळखण्यात आल्याने आरोपी सापडला

मातोश्रीत बांगलादेशी घुसल्यावर जाग येणार का? 

दिल्ली निवडणुकीनंतरच भाजपला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष!

दरम्यान सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगताना आरोपी हा बांगलादेशी नागरिक असल्याचे हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीचे असून सैफ अली वरील हल्ला हा आंतरराष्ट्रीय कट असलयाचा आरोप सरकारी वकिलाने न्यायालयात केला आहे. आरोपी रक्ताने माखलेलं कपडे पोलिसांना जप्त करायचे असून हल्लात वापरलेला चाकूचा तुकडा पोलिसांना जप्त करायचा आहे, तसेच आरोपीचा पूर्व इतिहास तपासकामी चौकशी करून तो बांगलादेशातून भारतात कसा आला, त्याला कोणी मदत केली, हे तपासन्यासाठी पोलिसांना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील यांनी न्यायालयात केली आहे.

मात्र आरोपीचे वकील संदीप शेरखाने यांनी सरकारी वकिलांचे सर्व दावे फेटाळून लावत आरोपी हा ७ वर्षांपासून मुंबईत राहतो, तसेच तो बांगलादेशी असल्याचे अद्याप सिद्ध झाले नसल्याचे आरोपीच्या वकीलाने म्हटले आहे, न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादयाला ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा