29 C
Mumbai
Saturday, June 19, 2021
घर विशेष 'सीएसएमटी'चा कायापालट लवकरच

‘सीएसएमटी’चा कायापालट लवकरच

Related

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसटी रेल्वे स्थानकाचं रुपडं लवकरच पालटणार आहे. येत्या काळात या स्थानकाला मॉलचं स्परुपही येणार आहे, असं म्हटलं जात आहे.

सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी अदानी रेल्वेसह इतर ९ कंपन्या शर्यतीत असल्याचं म्हटलं जात आहे. या स्थानकाला खरंच मॉलचं स्वरुप येणार हा हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अदानी, गोदरेज, कल्पतरु पॉवर्स यांसारख्या कंपन्या या स्थानकाच्या पुनर्विकासासाठीच्या शर्यतीत आहेत. लवकरच या कंपन्यांना सदर बाबतीतचं टेंडर देण्यात येणार आहे. १६०८ कोटी रुपयांचं हे टेंडर असणार असून, ६० वर्षांच्या भाडे तत्त्वावर हे करारपत्र करण्यात येणार आहे.

स्थानकाच्या दर्शनीय भागात एक गॅलरी तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये विमानतळावर देण्यात येणाऱ्या सुविधा दिल्या जातील असं कळत आहे. लवकरच यासाठीच्या कामाला सुरुवात होणार असून, कोणत्या कंपनीला यासाठीचं कंत्राट देण्यात येतं आणि नेमका हा कायापालट कसा होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

स्थानकात १८ नंबरच्या फलाटावर आलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी एक व्यवस्था करण्यात येणार आहे. तिकीटविक्री सुरु असणाऱ्या सध्याच्या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी करण्यात येणार असून हा जागतिक ठेवा सर्वांना दाखवण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा:

आम्हाला कोरोनाच्या जबाबदारीतून मुक्त करा

मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरण, सुनील माने बडतर्फ

कोरोना रुग्ण संख्येत ५ हजारांची वाढ

खंडणीखोर सरकारने पोलिसांकरवी वसुली सुरू, आता त्याची कटू फळे भोगावी लागत आहेत

सन १८७८ साली ब्रिटिशांनी बोरीबंदर स्थानकाच्या आधी वास्तुविशारद सर फेड्रिक विल्यम स्टीवन्स यांच्या अखत्यारीत एका भव्य दिव्य स्थानकाची निर्मिती सुरू केली. दहा वर्ष या स्थानकाचे काम अहोरात्र सुरू होते. त्याकाळी तब्बल सोळा लाखाहून जास्त रुपये खर्चून भारतातले सर्वात मोठे स्थानक १८८८ साली सुरू करण्यात आले. त्याचे नाव होते व्हिक्टोरिया टर्मिनस. हेच व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस.

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

 1. # रत्नागिरी जिल्ह्यातील
  RTPCR Covid-19 टेस्टचा बोगस कारभार.
  15/05/2021 ला covid test केली जवळच्या PHC मध्ये त्याचे अजून ही रिपोर्ट नाही,last Time मी पोस्ट केली होती त्यावर कितपत सुधारणा केली देव जाणे,
  RTPCR रेपोर्ट पिरेड 48 तासांचा मग ते रेपोर्ट 7-8 दिवसात
  आल्या वर काय उपयोग , रत्नागिरी जिल्यातील सर्व लोकांना विनंती आहे जिल्यात 66-67 PHC आहेत आणि येथून आलेलच्या RTPCR टेस्टसाठी रत्नागिरी जिल्ह्यात टेस्टिंगलॅब
  एकच आहे का उशिर होणार नाही सांगा.
  शक्यतो तूम्ही बाहेर कुठे जाणार नसाल तर RAPID टेस्ट करा,जर बाहेर जायचं असेल तर Private ठिकाणी टेस्ट करा GOV PHC मध्ये केलेत तर 48 तासाचा अवधी असल्या कारणाने त्याचा काही उपयोग होणार नाही.
  जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार साहेब यांना विनंती आहे मला माहित नाही की सर्व प्रकार तुम्हाला माहीत आहे की नाही तरी सुद्धा या गोष्टींची नोंदही कृपया करून घ्या,
  RTPCR चे रेपोर्ट कसे मिळवता येतील त्यासाठी काय उपाय योजना करता येईल त्यावर लक्ष द्या,सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणाऱ्या हॉस्पिटलची निर्मिती करा.
  #प्राथमिकआरोग्यकेंद्ररत्नागिरी
  ##जिल्हाप्रशासन
  एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्हाला नंम्र विनंती करतो
  लोकांच्या जीवाशी खेळणं बंद करा RTPCR ला वेळ लागत असेल तर Rapid टेस्ट करा जेने करून जे कोणी पोसिटीव्ह असतील त्यांना लवकर उपचार सुरू करण्यास मदत होईल,
  PHC HOD आणि त्या बॉडीवर काम करणाऱ्या सभासदानाही माझी नंम्रतेची विनंती आहे आपला तालुका,आपला विभाग,आपला गाव,आणि आपल्या माणसांची काळजी कशी घेता येईल यावर लक्ष द्या…
  आपला विश्वासु,
  रोमंच प्रिती प्रशांत.
  Stay safe stay home.
  #RajThackeray
  #UddhavThackeray
  #AdityaThackeray
  #SharadPawar
  #BhaskarJadhav
  #vinaynatu
  #suniltatkare
  #sadanadchavan
  #ShekharNikam

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा