30 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरविशेषबंगालच्या खाडीत ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीत ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका

पाच राज्यांना अलर्ट

Google News Follow

बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राने आता तीव्र स्वरूप धारण करण्यास सुरुवात केली असून, ‘अक्वान’ चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने या संभाव्य चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या वादळामुळे वाऱ्यांचा वेग ताशी १४५ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर रोजी बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन त्याचे रूपांतर डिप्रेशनमध्ये झाले. ही हवामान प्रणाली चेन्नईपासून सुमारे ८६० किलोमीटर अंतरावर असून, १६ नोव्हेंबरपर्यंत तिचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १७ नोव्हेंबरपर्यंत या वादळाची तीव्रता वाढून ते तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. त्यानंतर १९ नोव्हेंबरपर्यंत वाऱ्यांचा वेग ताशी १२० ते १३० किलोमीटर, तर वाऱ्यांच्या झोतांचा वेग ताशी १४५ किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हे वादळ उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याचा अंदाज असून, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने त्याची वाटचाल होऊ शकते. मात्र, वादळाचा संभाव्य मार्ग आणि ते नेमके कुठे धडकणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

हे ही वाचा:
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर ठार

राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुलीने गाठला नवा उच्चांक!

अंतराळातून परतणाऱ्या स्टारशिपला स्पेसएक्सने हवेतच पकडले

‘एक्स मुस्लिम’ साहिल यांच्यावर नवी मुंबईत जीवघेणा हल्ला

या चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबार बेटांवर जाणवण्याची शक्यता आहे. १८ आणि १९ नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर १९ आणि २० नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशामध्ये १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, समुद्रातील परिस्थिती प्रतिकूल होण्याची शक्यता लक्षात घेता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्रात असलेल्या मच्छीमारांनी तातडीने किनाऱ्यावर परतावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बंदरे आणि किनारपट्टीवरील प्रशासनालाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चक्रीवादळाची दिशा आणि तीव्रतेत बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा