28 C
Mumbai
Sunday, January 29, 2023
घरविशेषअनधिकृत फेरीवाल्यांकडून जप्त करण्यात आलेल्या सिलिंडरचा झाला स्फोट

अनधिकृत फेरीवाल्यांकडून जप्त करण्यात आलेल्या सिलिंडरचा झाला स्फोट

स्फोटात दोन पोलीस जखमी झाले.

Google News Follow

Related

काल दुपारच्या वेळेस खेरवाडी पोलीस ठाण्यात सिलेंडरचा स्फोट झाला. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई करून जप्त केलेल्या वस्तूंपैकी हा सिलिंडर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन पोलीस अधिकारी गंभीररित्या भाजले आहेत.

मुंबईत लाखो खाद्यपदार्थांच्या गाड्या लावल्या जातात. त्यापैकी काहींकडे परवाना नसतो तर काही गाड्या बेकायदेशीरपणे लावल्या जातात. नेहमीप्रमाणे एएसआय अरविंद खोत यांच्यासह काही पोलीस अधिकारी गस्तीसाठी गेले. त्यांनी या बेकायदेशीर गाड्यांच्या काही वस्तू आणि साहित्य जप्त केले. त्यांनी जप्त केलेला सर्व माल खेरवाडी पोलिस स्टेशनच्या स्टोअररूममध्ये ठेवला होता. दुपारी १२.४७ च्या सुमारास सिलिंडरचा मोठा स्फोट झाला ज्यात दोन पोलीस जखमी झाले. ही घटना दुपारी झाल्यामुळे पोलीस ठाण्यात अनेक लोक उपस्थित होते. त्या स्टोअररूम मध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांची आणि प्रकरणांची कागदपत्रे होती जे नष्ट झाल्याचे कळते आहे. एएसआय अरविंद खोत यांना बहुतांश जखमा झाल्या असून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

गोपीनाथ मुंडे : जनसामान्यांचा नेता

भूपेंद्र पटेल यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

अनिल देशमुख्यांच्या जामिनावर टांगती तलवार

नागपूर मेट्रोने कोरले गिनीज बुकात नाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एएसआय अरविंद खोत यांना तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. खोत हे आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना भाजले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही आग इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या पोलीस स्टेशनच्या स्टोअर रूममधील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, कार्यालयातील नोंदी आदींपुरती मर्यादित होती. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि त्वरित आग विझवण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,917चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा