27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरविशेषपावसाळी पुराच्या समस्येतून बोरिवलीतील डी.एन.म्हात्रे रस्त्याला मुक्तता

पावसाळी पुराच्या समस्येतून बोरिवलीतील डी.एन.म्हात्रे रस्त्याला मुक्तता

Related

बोरिवलीमधील डी. एन. म्हात्रे रस्त्यावर पावसाळ्यामध्ये साचणाऱ्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी सोडविण्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला यश आले आहे. महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने या रस्त्याला लागून सुमारे ४६५ मीटर अंतराची नवीन पर्जन्य जलवाहिनी बांधली असून नुकत्याच झालेल्या जोरदार पावसाप्रसंगी या परिसरातील पाण्याचा त्वरित निचरा झाल्याने डी. एन. म्हात्रे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई महानगराच्या भौगोलिक रचनेमध्ये अनेक सखल परिसरांचा समावेश आहे. अत्यंत जोरदार पावसाप्रसंगी आणि विशेषतः पाऊस सुरु असताना समुद्राला भरती असेल तर सखल भागांमध्ये पाणी साचते. ही समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने पर्जन्य जल उदंचन केंद्रांची बांधणी, सखल भागांमध्ये पावसाळ्यासाठी उदंचन व्यवस्था करणे, नवीन व अधिक क्षमतेच्या पर्जन्य जलवाहिन्या अंथरणे यासारख्या उपाययोजना मागील काही वर्षांपासून केल्या आहेत.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाने वेगवेगळ्या नावीण्यपूर्ण संकल्पना देखील राबवल्या जात आहेत. हिंदमाता, गांधी मार्केट यासारख्या भागांमध्ये जोरदार पावसामुळे हमखास साचणारे पाणी जलाशयांमध्ये साठवून त्याचा नंतर उपसा करण्याचा अभिनव प्रकल्प देखील यशस्वी ठरला असून त्याचे सकारात्मक परिणाम मुंबईकर अनुभवत आहेत.

मुंबईत जोरदार पावसाप्रसंगी पाणी साचण्याची संभाव्य अशी सुमारे ३८६ ठिकाणे होती. त्यापैकी तब्बल २८२ ठिकाणांवर पाण्याचा निचरा करणाऱ्या उपाययोजना प्रशासनाने यापूर्वीच पूर्ण केल्या होत्या. तर उर्वरित १०४ पैकी यंदा दिनांक ३१ मे २०२२ पूर्वी आणखी २४ ठिकाणांची कामे पूर्ण करण्यात आली. म्हणजेच आजवर ३०६ ठिकाणांची पावसाळी पाण्याच्या समस्येपासून सुटका झाली आहे. उर्वरित ८० ठिकाणांवरची कामे देखील २०२३ च्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या दिशेने वेगाने कार्यवाही सुरु आहे.

ज्या २४ ठिकाणांवर केलेल्या उपाययोजना यंदा यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले आहे, त्यामध्ये आर-मध्य विभागातील बोरिवली (पश्चिम) येथील डी. एन. म्हात्रे रस्त्याचाही समावेश आहे. हा परिसर सखल असल्याने येथे अतिपावसाच्या वेळी हमखास पाणी साठून स्थानिक रहिवाशांना, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता आणि वाहतुकीवर देखील विपरित परिणाम होत होता. या रस्त्यावर विशेषतः एकसार गुरुकृपा सोसायटी लगत बशीच्या आकाराचा भाग असल्याने आणि एकसार महानगरपालिका शाळेजवळ पर्जन्य जलवाहिन्यांना अडथळा असल्याने पावसाळी पाण्याचा निचरा लवकर होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

हे ही वाचा:

शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पाच रुपयांनी, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर

अतिवृष्टीमुळे ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

ही समस्या दूर करण्यासाठी महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाने डी. एन. म्हात्रे रस्त्याला लागून देवीदास मार्गावरील ओम शांती चौक ते एकसार रस्त्यावरील लहान नाल्यापर्यंत चौकोनी आकाराची नवीन पर्जन्य जलवाहिनी बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूर्वीची ०.६ मीटर आकाराची पर्जन्य जल वाहिनी बदलून नवीन १.५ चौरस मीटर आकाराची व सुमारे ४६५ मीटर लांबीची नवीन पर्जन्य जलवाहिनी बांधण्याचे काम हाती घेवून दिनांक ३१ मे २०२२ च्या आधीच म्हणजेच यंदाचा पावसाळा सुरु होण्यापूर्वीच सर्व काम पूर्ण करण्यात आले. या कामासाठी सुमारे २ कोटी ८५ लाखांचा खर्च झाला आहे.

नुकत्याच झालेल्या जोरदार पावसाप्रसंगी डी. एन. म्हात्रे रस्ता परिसरातील पाण्याचा तत्क्षणी निचरा झाल्याने, नवीन पर्जन्य जलवाहिनी व उपाययोजना यशस्वी झाल्याचे सिद्ध झाले आहे. हा परिसर पावसाळी पाण्याच्या समस्येपासून मुक्त झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा