28 C
Mumbai
Monday, September 7, 2026
घरविशेषबदलापूरमध्ये सेफ्टी बेल्ट तुटल्याने चिमुकला सातव्या थराहून थेट खाली कोसळला

बदलापूरमध्ये सेफ्टी बेल्ट तुटल्याने चिमुकला सातव्या थराहून थेट खाली कोसळला

सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Google News Follow

Related

बदलापूरमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान थरारक घटना घडली. ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’त प्रज्वल प्रतिष्ठानच्या गोविंदा पथकाने सात थरांची सलामी दिली. सातव्या थरावर चिमुकला गोविंदा हंडी फोडण्यासाठी सज्ज असतानाच अचानक त्याचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि तो थेट खाली कोसळला. हा प्रकार पाहताच उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला आणि काही क्षणांसाठी घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. सुदैवाने अनर्थ टळला आणि चिमुकल्याला तातडीने सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

या दहीहंडीचे आयोजन शिवसेना युवा सेनेचे शहरप्रमुख मितेश धुळे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. उंच मानवी मनोरे रचताना गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्टसह विविध सुरक्षा उपाययोजना केल्या जातात. विशेषतः सर्वात वरच्या थरावर चढणाऱ्या बालगोविंदांसाठी सेफ्टी बेल्ट महत्त्वाचा मानला जातो. मात्र, बदलापूरमध्ये सुरक्षेसाठी लावलेला हाच बेल्ट तुटल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. बेल्ट नेमका कोणत्या कारणामुळे तुटला, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून आयोजकांकडून या घटनेची चौकशी केली जात आहे.
हे ही वाचा:
बटवारा १९४७ वर तारासिंगचा हॅण्डपम्प कोसळला…

मैसूर एक्सप्रेस’ जवागल श्रीनाथ!

भारत – उझबेकिस्तान संबंधांना युरेनियमचे नवे इंधन

कोलकाता बिलबोर्ड वादात अभिषेक बॅनर्जींना पोलिसांचे समन्स

दहीहंडी हा उत्साह, परंपरा आणि गोविंदांच्या साहसाचा सण असला तरी उंच थरांमुळे अपघाताचा धोका कायम असतो. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह राज्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणावर दहीहंडीचे आयोजन केले जाते. मोठ्या बक्षिसांसाठी गोविंदा पथकांकडून नऊ-दहा थरांचे मानवी मनोरे उभारले जातात. त्यामुळे गोविंदांच्या, विशेषतः बालगोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. बदलापूरच्या या घटनेने दहीहंडीतील जल्लोषासोबतच सुरक्षेची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
330,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा