27 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरविशेषदिल्लीचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०० पार

दिल्लीचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०० पार

राजधानीवर विषारी धुक्याचे संकट

Google News Follow

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. दिल्लीसह एनसीआर परिसरातील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून, अनेक भागांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ४०० च्या पुढे गेला आहे. रविवारी सकाळी दिल्लीचा सरासरी AQI ३५४ नोंदवण्यात आला. नरेला येथे ४२२, आयटीओ येथे ४१५, तर पूसा परिसरात ४०५ इतकी प्रदूषणाची पातळी नोंदवण्यात आली. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना अधिक धोका निर्माण झाला आहे.

दिल्लीतील प्रदूषण वाढण्यामागे वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामांमधील धूळ आणि शेजारील राज्यांमधून येणारे प्रदूषित वारे ही प्रमुख कारणे आहेत. हवेतील पीएम २.५ या सूक्ष्म प्रदूषकांचे प्रमाण वाढल्याने श्वसनासंबंधी त्रास होण्याची शक्यता आहे. पराली जाळण्याच्या घटनांमुळेही प्रदूषणात भर पडत आहे. मात्र, स्थानिक प्रदूषण आणि वातावरणातील मंद वाऱ्यांमुळे प्रदूषित घटक हवेतच साचून राहत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
हे ही वाचा:
मुंबईत सीएनजीच्या दरात दिड रूपयांनी वाढ

मेट्रोचा विस्तार मोठा, पण किती होईल नफा-तोटा?

मोदींनी काँग्रेसजनांना असे केले ‘टॅप’ |

कोकणातल्या तीन सुवर्णकिनाऱ्यांवर ‘निळा झेंडा’ |

प्रदूषण नियंत्रणासाठी दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनच्या तिसऱ्या टप्प्यातील (GRAP-3) निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याअंतर्गत बांधकाम आणि पाडकामाच्या कामांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. बीएस-६ निकषांची पूर्तता न करणाऱ्या बाहेरील वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जुन्या डिझेल आणि पेट्रोल वाहनांवरही कारवाई सुरू आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने १५ नोव्हेंबरला दिल्लीच्या काही भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, या पावसामुळे प्रदूषणात मोठी घट होण्याची शक्यता कमी आहे. पुढील काही दिवस हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, बाहेर जाताना एन-९५ मास्कचा वापर करावा आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा