26 C
Mumbai
Thursday, January 1, 2026
घरविशेषकुतुबमिनार, लाल किल्ला आणि इतर ऐतिहासिक स्थळांवर सुरक्षा वाढवली!

कुतुबमिनार, लाल किल्ला आणि इतर ऐतिहासिक स्थळांवर सुरक्षा वाढवली!

दिल्ली पोलिसांकडून सर्वत्र नजर 

Google News Follow

Related

पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्त्नानविरुद्ध सुरु केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरु आहे. ऑपरेशन अंतर्गत भारताने आतापर्यंत पीओके आणि पाकिस्तानमधील १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. पाकिस्तान माघार घेण्याऐवजी भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारता त्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना दिल्ली पोलिसांनी लाल किल्ला आणि कुतुबमिनारसह शहरातील ऐतिहासिक वास्तूंभोवती सुरक्षा वाढवली आहे. या प्रतिष्ठित वास्तूंजवळ अतिरिक्त पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख देखील वाढविण्यात आली आहे. या ठिकाणी सामान्यतः नियमित सुरक्षा असते, परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे दिल्लीच्या विविध भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढली आहे. या ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता, सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे.

हे ही वाचा : 

भारतीय आणि विदेशी खेळाडूंना घरी पाठवण्याबाबत फ्रँचायझी संभ्रमात

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने भारतीय ‘हीरोज’ला सलाम, म्हणाले – “जय हिंद!”

पीएसएल एक्स चे सामने युएईत हलवले

Viral Video : हळदीच्या कार्यक्रमात नवरीची एंट्रीने बसला सर्वांना धक्का

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सशस्त्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुरुवारी (८ मे) रात्री पाकिस्तानी सैन्याने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह अनेक भारतीय ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारताने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले आणि लाहोरमधील पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली नष्ट करण्यात आली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा