28.2 C
Mumbai
Saturday, July 25, 2026
घरविशेषAI सांगणार धारावीकरांना घर कधी मिळणार

AI सांगणार धारावीकरांना घर कधी मिळणार

धारावी पुनर्विकासासाठी 'धारावी दीदी' लॉन्च

Google News Follow

Related

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत मनात असलेल्या विविध शंका आणि प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या धारावीकरांसाठी आता एक नवी आणि अत्यंत महत्त्वाची सुविधा सुरू झाली आहे. घराचे झालेले सर्वेक्षण, पात्रतेचे निकष, लागणारी महत्त्वाची कागदपत्रे आणि नवीन घर कधी मिळणार, अशा अनेक प्रश्नांची अधिकृत उत्तरे देण्यासाठी ‘धारावी दीदी’ ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित डिजिटल सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. या नव्या सुविधेमुळे आता धारावीकरांना कोणत्याही अनधिकृत चर्चेवर किंवा अफवांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या ‘अदाणी नवभारत डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ (एएनडीपीएल) या कंपनीने ही एआय सेवा सुरू केली आहे. ही यंत्रणा आठवड्याचे 7 दिवस आणि २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतरही स्थानिकांना त्यांच्या सोयीनुसार हवी ती माहिती मिळवता येणार आहे. एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणे संयमाने ऐकून घेऊन योग्य मार्गदर्शन करणे, या संकल्पनेतून या डिजिटल सेवेचे नाव ‘धारावी दीदी’ असे ठेवण्यात आले आहे.

धारावीतील नागरिकांना ‘धारावी दीदी’शी संवाद साधण्यासाठी व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉल आणि व्हॉट्सॲपचा पर्याय देण्यात आला आहे. ज्या नागरिकांना डिजिटल माध्यमांचा जास्त वापर करता येत नाही, त्यांनाही ही प्रणाली सहज वापरता येईल अशा पद्धतीने ती विकसित केली गेली आहे. सध्या ही सुविधा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3 भाषांमध्ये उपलब्ध असून, येत्या काही महिन्यांत तमिळ, तेलगू आणि गुजराती भाषांचाही यामध्ये समावेश केला जाणार आहे.

हे ही वाचा:

मुंबईतील आंदोलनाप्रकरणी ९०० हून अधिक आंदोलकांवर एफआयआर दाखल

राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग

शांततापूर्ण आंदोलनाला हिंसेची किनार

“पेपर लीक हा राजकारणाचा विषय नाही”

प्रकल्पाबाबत मिळणारी माहिती ही थेट अधिकृत प्राधिकरणाकडून येणार असल्याने कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा गैरसमजांना पूर्णपणे आळा बसणार आहे. या सुविधेमुळे पुनर्विकासाच्या प्रत्येक टप्प्याची अचूक माहिती थेट रहिवाशांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना योग्य निर्णय घेणे शक्य होईल. एएनडीपीएलच्या अधिकृत वेबसाईटवरील लिंकद्वारे व्हिडिओ कॉल करून किंवा +91-8071579787 या क्रमांकावर व्हॉईस कॉल व व्हॉट्सॲप करून धारावीकर या सेवेचा लाभ घेऊ शकतात.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
322,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा