30 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरविशेषधर्मेंद्र म्हणजे चांगुलपणाचं प्रतीक

धर्मेंद्र म्हणजे चांगुलपणाचं प्रतीक

शर्मिला टागोर यांनी सांगितल्या आठवणी

Google News Follow

Related

ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांच्या निधनानंतर अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. वयाच्या ८९ व्या वर्षी धर्मेन्द्र यांच्या निधनानंतर इंडिया टुडेशी बोलताना शर्मिला टागोर म्हणाल्या की, तो असा दुर्मिळ माणूस होता ज्याच्या उपस्थितीने आम्हाला अधिक सुरक्षित वाटायचे. धर्मेंद्र हे अत्यंत प्रेमळ आणि सन्मानपूर्ण वाटायची.

“आम्ही धर्मेंद्र यांच्यासोबत असू, तर आम्ही सुरक्षित आहोत, हे आम्हाला ठाऊक होतं”, असं त्या म्हणाल्या. धर्मेन्द्र कमी बोलणारे, पण अतिशय प्रेमळ होते, असे त्या सांगता.. एका प्रसंगाची आठवण सांगताना त्यांनी सांगितले की, एकदा धर्मेन्द्र यांनी गर्दीतून त्यांना स्वतःच्या संरक्षणात सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्या म्हणाल्या, “त्या वेळी आम्हाला अशा प्रकारचं संरक्षण मिळायचं नाही. मला बाहेर काढणं त्यांनीच जमवून आणलं.आज मला खूप दुःख होतंय, ते आता आमच्यात नाहीत.”

पहिली भेट आणि पहिली छाप

शर्मिला टागोर यांची धर्मेन्द्र यांच्याशी प्रथम भेट ‘अनुपमा’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली. त्या म्हणाल्या—
“तो एक साधा, मनमिळावू, प्रामाणिक आणि काळजी घेणारा माणूस होता. स्टार असल्याचा गर्व त्यात कधीच नव्हता.

शर्मिला यांच्या मते, धर्मेन्द्र यांची उदारता ही केवळ मोठ्या कृतीत नव्हे, तर रोजच्या वागणुकीतही दिसत असे.
“तो कुटुंबाची काळजी घ्यायचा, मित्रांची काळजी घ्यायचा. इतका उदार माणूस शोधायला कठीण आहे. आजकाल लोक फक्त स्वतःबद्दल विचार करतात,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्यासोबत अमेरिका दौरा आठवत शर्मिला म्हणाल्या, “जेव्हा आम्ही अमेरिकेत गेलो, तिथेही लोक त्यांना पसंत करत होते. तो लोकांच्या मनात कायम राहील.”

हे ही वाचा:

मलेशियात १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी?

पंकजा मुंडेंचा स्वीय सहाय्यक अनंत गर्जेला अटक

पाच वर्षांच्या साईशा देवलची मल्लखांब स्पर्धेत सोनेरी चमक

अस्लम शेखवर गुन्हा दाखल करा! मालवणीत संताप

शेवटच्या काळातील संवाद

अलीकडच्या वर्षांत शर्मिला टागोर फोनवरून धर्मेन्द्र यांच्याशी संपर्कात होत्या. प्रकृती खालावत असतानाही सर्वांना आशा होती की ते पुन्हा बरे होतील. “आम्ही वाट पाहत होतो, त्यांचा वाढदिवस साजरा व्हावा. ते ९१ वर्षांचे झाले असते आणि पुढच्या महिन्यात मी ८१ वर्षांची झाले असते,” त्या म्हणाल्या.

तरुण पिढीने ‘धर्मेन्द्र’ यांचे चित्रपट पाहावेत

त्यांच्या अभिनयाची आठवण करताना शर्मिला टागोर यांनी तरुणांनी धर्मेन्द्र यांच्या क्लासिक चित्रपटांकडे पुन्हा वळावे, असे सांगितले,  विशेषतः ‘चुपके चुपके’. त्या म्हणाल्या, “एकदा तो त्या चित्रपटाच्या शूटिंगला उशिरा आला आणि हृषिदा यांनी शूटिंग त्याच्याशिवाय सुरू केलं. त्या दिवसानंतर तो कधीच उशिरा आला नाही.”

‘सत्यकाम’, ‘अनुपमा’, ‘चुपके चुपके’, ‘एक महल हो सपनों का’ अशा अनेक अविस्मरणीय चित्रपटांत धर्मेंद्र आणि शर्मिला यांनी एकत्र काम केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा