26 C
Mumbai
Monday, February 16, 2026
घरविशेषपाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी डीजेने वाजवला 'जलेबी बेबी'

पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी डीजेने वाजवला ‘जलेबी बेबी’

खेळाडूंचा गोंधळ 

Google News Follow

Related

१४ सप्टेंबर, रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात झालेल्या झालेल्या गोंधळामुळे खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. सामन्यापूर्वी पाकिस्तानचे खेळाडू राष्ट्रगीत गाण्यासाठी सज्ज होत असताना, डीजेने एक मोठी चूक केली आणि त्याऐवजी ‘जलेबी बेबी’ वाजवले, ज्यामुळे खेळाडू आणि चाहते गोंधळले. 

पाकिस्तानी खेळाडूंनी छातीवर हात ठेवून उभे असताना ग्राउंड डीजेने चुकून पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजवण्याऐवजी ‘जलेबी बेबी’ गाणे वाजवले. तथापि, चूक लवकर दुरुस्त करण्यात आली आणि पाकचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. दरम्यान, या कालावधीत खेळाडूंचा उडालेला गोंधळ पहायला मिळाला आणि काहीजण संतापल्याचेही दिसले.

ही काही पहिलीच वेळ नाही की पाकिस्तानबाबत राष्ट्रगीताच्या संदर्भात गडबड झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान लाहोरमध्ये भारतीय राष्ट्रगीत ‘जन गण मन’ चुकीने वाजवले गेले होते, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चांगलीच अडचण झाली होती. याशिवाय, २२ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान, DJ ने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी चुकीने भारतीय राष्ट्रगीत वाजवले.

हे ही वाचा : 

टेक्सासमधील भारतीय वंशाच्या नागरिकाच्या हत्येवर डोनाल्ड ट्रम्प संतापले!

एक कोटींचे बक्षीस असलेल्या माओवादी नेत्यासह दोघांचा खात्मा

परतीच्या पावसाची दमदार हजेरी; मुंबईत रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम

कर्णधार सूर्यकुमारने पाकिस्तानवरील विजय केला भारतीय जवानांना समर्पित

दरम्यान, आशिया कपमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय भारतीय सैन्याला समर्पित केला. तथापि, सामन्याचे मुख्य आकर्षण म्हणजे सामन्यानंतरची पत्रकार परिषद, जिथे सूर्या आणि टीम इंडियाने हा विजय देशाच्या सैनिकांना समर्पित केला आणि त्यांचा सन्मान केला. उल्लेखनीय म्हणजे, पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ पहिल्यांदाच एकमेकांसमोर आले होते. 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा