34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेष'डॉक्टर डे' च्या दिवशीच डॉक्टर दाम्पत्याचा करुण अंत

‘डॉक्टर डे’ च्या दिवशीच डॉक्टर दाम्पत्याचा करुण अंत

Google News Follow

Related

गुरुवार, १ जुलै रोजी एकीकडे संपूर्ण देशभर डॉक्टर डे साजरा होत असतानाच पुणे शहर मात्र डॉक्टर दाम्पत्याच्या आत्महत्येमुळे हादरून निघाले आहे. पुणे शहरातील वानवडी भागातील आझाद नगर या परिसरात ही घटना घडली असून ३० जून आणि १ जुलै अशा सलग दोन दिवशी डॉक्टर दाम्पत्याने गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे.

डॉक्टर निखिल दत्तात्रय शेंडकर आणि डॉक्टर अंकिता निखिल शेंडकर असे या मृत डॉक्टर दाम्पत्याचे नाव असून नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. डॉक्टर अंकिता ही २६ वर्षांची असून तिचा पती निखिल शेंडकरचे वय २८ वर्ष होते.

बुधवार, ३० जून रोजी डॉक्टर अंकिता शेंडकर यांनी वानवडी येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली. घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत अंकिता यांनी आपले जीवन संपवले. ३० जून रोजी रात्री ८ च्या सुमारास वानवडी पोलीस चौकीचे अंमलदार इनामदार यांना या घटनेची माहिती मिळाली. अंकिता यांना उपचारासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र रुग्णालयात येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

हे ही वाचा:

दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?

गुलशन कुमारचा मारेकरी अब्दुल रौफ कोणत्याही दयेच्या लायक नाही

कम्युनिस्ट उत्तर कोरियावर उपासमारीची वेळ

कोस्टल रोडच्या कामात खोडा घालणाऱ्यांना खडे बोल

या संपूर्ण घटनेला अवघ्या काही तासांचा अवधी उलटत असतानाच अंकिताचे पती डॉक्टर निखिल शेंडकर यांच्या आत्महत्येची माहिती समोर आली. गुरुवार, १ जुलै रोजी सकाळी सातच्या सुमारास निखिल यांनीदेखील ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या दोन्ही प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा