33 C
Mumbai
Monday, May 29, 2023
घरविशेषलोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. मनोज सोनी

लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. मनोज सोनी

डॉ. मनोज सोनी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली

Google News Follow

Related

डॉ. मनोज सोनी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य स्मिता नागराज यांनी त्यांना शपथ दिली.

डॉ. मनोज सोनी यांनी  २८ जून २०१७ रोजी आयोगाचे सदस्य म्हणून त्यांच्या कार्याला प्रारंभ केला आणि नंतर ५ एप्रिल २०२२ पासून भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१६ (अ) अंतर्गत आयोगाच्या अध्यक्षपदाची कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये नेमणूक होण्याआधी, डॉ. सोनी यांनी आंतरराष्ट्रीय नातेसंबंधांचा अभ्यास या विषयात विशेष प्राविण्य मिळवले तसेच सरदार वल्लभभाई विद्यापीठातून ‘शीतयुध्दपश्चात काळात आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील स्थित्यंतर आणि भारत- अमेरिका संबंध’ या विषयात डॉक्टरेट मिळवली. बडोदा येथील एम.एस महाविद्यालयाचे उपकुलगुरू म्हणून एकदा आणि गुजरातच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे उपकुलगुरू म्हणून दोनदा अशी एकूण तीन वेळा उप-कुलगुरूपदाची जबाबदारी निभावली आहे.

हे ही वाचा:

अतुल खिरवडकर राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे सीईओ

‘गोल्फादेवी’चा जयजयकार, समर्थ स्पोर्टसही विजेते

काँग्रेसमुळे कर्नाटकच्या डोक्यावर ६२ हजार कोटींचा ‘फुकट’चा भार वाढणार

सीबीआयने बेनामी संपत्तीवाल्यांच्या आणले नाकी ‘नऊ’

स्वातंत्र्यप्राप्ती नंतरच्या काळातील ते वयाने आतापर्यंतचे सर्वात लहान उपकुलगुरू ठरले आहेत. डॉ. सोनी यांना अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले असून त्यांच्याद्वारे लिखित अनेकानेक उत्तम साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,018अनुयायीअनुकरण करा
75,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा