33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरविशेषडॉ. उदय निरगुडकर NHPC च्या संचालकपदी

डॉ. उदय निरगुडकर NHPC च्या संचालकपदी

Related

प्रसार माध्यमे आणि व्यावसायिक क्षेत्रात चांगले नाव असलेले डॉ. उदय निरगुडकर यांची नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या (NHPC) संचालकपदी नियुक्ती झाली आहे. निरगुडकर यांची नियुक्ती ही तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

एनएचपीसी लिमिटेड हे भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मालकीचे भारत सरकारचे जलविद्युत मंडळ आहे. एनएचपीसी लिमिटेड हे १९७५ मध्ये २ हजार दशलक्ष रुपयाच्या अधिकृत भांडवलासह आणि जलविद्युतच्या एकात्मिक आणि कार्यक्षम विकासाची योजना, प्रचार आणि आयोजन करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले होते. कालांतराने एनएचपीसीने सौर, भूऔष्णिक, भरती- ओहोटी, वारा इत्यादी उर्जेचे इतर स्त्रोत समाविष्ट केले. ही १० हजार कोटी उलाढाल असलेली भारत सरकारची एक मिनी नवरत्न कंपनी आहे. जलविद्युत उर्जा व्यतिरिक्त सौर, पवन आणि समुद्राच्या लहरी वीज मध्येही कार्य करते.

हे ही वाचा:

मिलिंद तेलतुंबडे यमसदनी! गृहमंत्र्यांनी केले शिक्कामोर्तब

… म्हणून राजधानीत लागणार लॉकडाऊन

त्रिपुरात कोणत्याही मशीदिची तोडफोड, नुकसान झालेच नाही

तुमच्याकडून लाच तर घेतली गेली नाही ना, पंतप्रधानांनी विचारला प्रश्न…काय आहे प्रकरण?

डॉ. उदय निरगुडकर हे ‘नेटवर्क१८’ मध्ये संस्थेच्या ‘न्यूज१८ लोकमत’ या मराठी वृत्तवाहिनीचे प्रादेशिक (पश्चिम) समूह संपादक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते ‘झी मीडिया’मध्ये ‘झी २४ तास’चे चॅनल प्रमुख होते. तसेच त्याच समूहातील इंग्रजी वृत्तपत्र डीएनएचे ते सीईओ आणि मुख्य संपादक होते.

त्यांना पायाभूत सुविधा, बीपीओ, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील उद्योगांमध्ये दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. पत्रकारितेतील योगदान आणि त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा