27.2 C
Mumbai
Tuesday, June 30, 2026
घरविशेषभयंकर तापमानामुळे युरोपात डांबरच नव्हे सिग्नलही वितळले, रस्ते उखडले

भयंकर तापमानामुळे युरोपात डांबरच नव्हे सिग्नलही वितळले, रस्ते उखडले

शेकडो लोकांचा मृत्यू, शाळा बंद, उष्णतेचा विळखा

Google News Follow

Related

रविवारी युरोपातील अनेक भागांमध्ये तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत पोहोचले. शास्त्रज्ञांच्या मते, २० जूनपासून सुरू झालेली ही उष्णतेची लाट आतापर्यंतच्या नोंदवलेल्या सर्वात भीषण उष्णतेच्या लाटांपैकी एक आहे. या प्रचंड उष्णतेमुळे वीज निर्मितीवर परिणाम झाला असून, पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे आणि आरोग्य व्यवस्था ताणाखाली आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले, “सध्या १५ कोटी लोक अत्यंत उष्णतेच्या विळख्यात आहेत. शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे, शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत आणि वीज वितरण व्यवस्था कोलमडत आहे.”

अनेक ठिकाणी रस्ते उखडल्याचे व्हीडिओ समोर येत असून काही ठिकाणी रस्त्यावरील डांबरही भयंकर तापमानामुळे वितळल्याचे दिसत आहे. इटलीत तर रस्त्यावरील एक सिग्नलच वितळल्याचे दिसते आहे.

हे ही वाचा:

इस्कॉनकडून कोलकाता येथील प्रमुख धर्मगुरूंची हकालपट्टी

दक्षिण कोरियाच्या प्रशिक्षक होंग म्युंगबो यांचा राजीनामा

जगाचा ‘बदला’ घेण्याच्या अजब आणि क्रूर इराद्याने वाटल्या विषारी गोळ्या

पाकिस्तानचा सीमापार हल्ला, २९ दहशतवादी ठार केल्याचा दावा

हवामान बदलामुळे उष्णतेची तीव्रता

शास्त्रज्ञांच्या मते, मानवनिर्मित हवामान बदलाशिवाय ही उष्णतेची लाट जवळपास अशक्य होती. गेल्या दोन दशकांच्या तुलनेत यावेळी रात्रीचे अत्यंत उच्च तापमान होण्याची शक्यता १०० पट वाढली आहे.

पॅरिसमध्ये फॅशन शोवर वाद

पॅरिस मेन्स फॅशन वीक दरम्यान लुई व्हिटॉनच्या शोमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम प्रचंड लाटेवरून वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर अनेकांनी उष्णतेच्या काळात पाण्याची नासाडी केल्याचा आरोप केला. मात्र एलव्हीएमएच कंपनीने स्पष्ट केले की वापरलेले पाणी पुन्हा सांडपाणी व्यवस्थेत सोडले जाणार आहे.

जर्मनीतील वाहतूक विस्कळीत

जर्मनीतील नॉर्थ राईन-वेस्टफेलिया राज्यात प्रमुख रेल्वेमार्गावरील रेल्वे सेवा कमी करण्यात आली. लाइपझिग शहरात ट्राम सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. स्थानिक वृत्तांनुसार अनेक नागरिकांनी सूर्यास्तापर्यंत घराबाहेर पडणे टाळले.

महामार्गाला तडे

२६ जून रोजी तीव्र उष्णतेमुळे जर्मनीतील ए२ महामार्गाचा पृष्ठभाग फुगून अनेक लेनमध्ये तडे गेले. बर्लिन पोलिसांनी शनिवारी आणि रविवारी नागरिकांना गारवा मिळावा म्हणून वॉटर कॅनन (पाण्याच्या तोफा) वापरल्या.

ट्रॅफिक सिग्नल वितळल्याचा व्हिडिओ

इटली आणि जर्मनीमध्ये उष्णतेमुळे ट्रॅफिक सिग्नल वितळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पर्यावरणविषयक तुर्की वाहिनीने हा व्हिडिओ शेअर केला होता.

फ्रान्समध्ये १००० अतिरिक्त मृत्यू

फ्रान्सच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेनुसार २४ जूनपासून साधारण १००० अतिरिक्त मृत्यू नोंदवले गेले आहेत. बहुसंख्य मृत्यू ६५ वर्षांवरील नागरिकांचे झाले असून, घरात होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पोलंडमधील स्लुबिसे शहरात तापमान ४०.५°C पर्यंत पोहोचले. हा देशातील आतापर्यंतचा सर्वाधिक तापमानाचा विक्रम आहे.

चेक प्रजासत्ताकमध्ये विक्रमी उष्णता

चेक प्रजासत्ताकच्या डोक्सानी येथे तापमान ४१.९°C नोंदवले गेले. हवामान विभागाने सांगितले की देशाच्या अधिकृत हवामान केंद्रांच्या इतिहासात प्रथमच ४१ °C पेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे.

जर्मनीत ४१.७°C

जर्मनीतील कोशेन येथे तापमान ४१.७°C नोंदवले गेले. यामुळे अवघ्या एका दिवसापूर्वी ड्रेव्हिट्झ येथे नोंदवलेला ४१.५°C चा विक्रम मोडला.

जर्मनीतील सर्वाधिक उष्ण रात्र

पूर्व जर्मनीतील कुब्शुट्झ येथे रात्रीचे तापमान २९.४°C च्या खाली गेले नाही. सुमारे १५०  वर्षांच्या हवामान नोंदींमधील ही सर्वाधिक उष्ण रात्र ठरली. रविवारी सुमारे १९.१ कोटी लोकांना ३५°C किंवा त्याहून अधिक तापमानाचा सामना करावा लागला. जर्मनी, झेक प्रजासत्ताक, हंगेरी आणि पोलंडमध्ये उष्णतेची तीव्रता सर्वाधिक होती.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा