27 C
Mumbai
Saturday, September 14, 2024
घरविशेषदंगलीवेळी ‘त्या’ पाण्याच्या टाकीत पाणी नाही तर भरले होते दगड

दंगलीवेळी ‘त्या’ पाण्याच्या टाकीत पाणी नाही तर भरले होते दगड

Google News Follow

Related

उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारी जमिनीवरील बेकायदेशीर बांधकामे हटवण्यासाठी आले तेव्हा पालिका अधिकारी आणि पोलिसांवर मुस्लीम जमावाने दगडफेक केली. त्यानंतर जाळपोळ, गोळीबारासह हिंसाचाराचा भडका उडाला. पोलीस ठाणे आणि पेट्रोल पंप जाळण्यात आले. अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. दंगलीदरम्यान, एक व्यक्ती बाईकवर बसलेली दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणांनी गुरुवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनेचे रेकॉर्डिंग केले आणि घडलेला प्रकार सांगितला. हा सगळा प्रकार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडला.

व्हिडीओमध्ये त्याने पोलिसांवर कशी दगडफेक झाली हे कॅमेऱ्यात कैद केले. त्या व्यक्तीचे नाव दीपांशू असे आहे. तो घटना घडली तेव्हा घटनास्थळी होता. दीपांशू म्हाणाला १००-१५० महिला अधिकारी हेल्मेट घालून जीव वाचवण्यासाठी धावत होत्या. त्यात अनेकांना दुखापत झाली. त्यातील काहीना रुग्णालयात नेण्यात आले. तिथे असलेल्या मुस्लीम जमावाकडून दगडफेक होत होती. अनेक सरकारी अधिकारी जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून, पायातून आणि हातातून रक्तस्त्राव होत होता, असे दिपांशुने सांगितले.

हेही वाचा..

एबी डी व्हिलिअर्सने मागितली विराट कोहली, अनुष्का शर्माची माफी

‘भारत जोडो यात्रे’ला वेळेआधीच विराम मिळण्याची चिन्हे

काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले प्रमोद कृष्णम म्हणाले, राम आणि राष्ट्र याबाबत तडजोड नाही!

गुंड शरद मोहोळ यांच्या पत्नीला धमकावणारा आरोपी रुग्णालयातून फरार!

हिंदू-मुस्लीम बंधूभावाबद्दल बोलणाऱ्या वास्तव दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला असल्याचे त्याने सांगितले. हल्लेखोरांनी छतावरून दगडफेक करण्यास सुरुवात केली. तिथली टाकी हि पाण्याने नाही तर दगडाने भरली होती. पाहणीत कोणतेही दगड सापडले नाहीत म्हणजे ते लपवून ठेवण्यात आले आहेत. विहिंप आणि बजरंग दलाचे कार्यकर्तेच यावेळी रक्तदानासाठी पुढे आले. यात प्रशासनाचा काहीही दोष नाही कारण ते केवळ न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कर्तव्य बजावण्यासाठी आले होते.

दीपांशू म्हणाला, दंगलखोर जमावाने ‘अल्लाहू अकबर’ सारख्या घोषणा दिल्या. काँग्रेस आमदार सुमित हृदयेश अजूनही दंगलखोरांसोबत असल्याचा खुलासा त्यांनी केला. तो म्हणाला, पोलीस प्रशासनाने कोणावरही अत्याचार केले नाहीत, उलट त्यांच्यावर राक्षसासारखा प्राणघातक हल्ला करण्यात आला. दीपांशू हा फोटोग्राफीचे दुकान चालवतो. हल्द्वानीच्या जिल्हाधिकारी वंदना सिंह यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर, हल्द्वानीच्या बनभूलपुरामध्ये दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देऊन कर्फ्यू लागू करण्यात आला.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा