राजधानी दिल्लीला सकाळी भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर काही वेळाने बिहारमध्येही भूकंपाचा धक्का जाणवल्याचे समोर आले आहे. बिहारमध्ये सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.
सोमवारी दिल्लीनंतर लगेचच बिहारमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचे केंद्र बिहारच्या सिवान जिल्ह्यात होते. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, रिश्टर स्केलवर याची तीव्रता ४.० इतकी होती. तर, जमिनीखाली १० किलोमीटर खाली याचे केंद्र होते. सध्या अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
EQ of M: 4.0, On: 17/02/2025 08:02:08 IST, Lat: 25.93 N, Long: 84.42 E, Depth: 10 Km, Location: Siwan, Bihar.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/nw8POEed0M— National Center for Seismology (@NCS_Earthquake) February 17, 2025
दिल्लीत पहाटे ५.३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. याचे केंद्र दिल्लीच्या जवळच जमिनीपासून ५ किलोमीटर खोलीवर होते. हा भूकंप दिल्ली-एनसीआरमध्ये २८.५९ उत्तर अक्षांश, ७७.१६ पूर्व रेखांश, ५ किमी खोलीवर झाला. दिल्लीत अचानक झालेल्या या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जोरदार भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेक लोक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाच्या वेळी लोक घराबाहेर उभे असलेले आणि पंखे किंवा घरातील इतर वस्तू हलत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, सुदैवाने कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही.
हे ही वाचा :
कोण कुणाला भेटले यावरून कसे काय राजकारण होऊ शकते?
दिल्लीला ४.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; पंतप्रधान मोदींकडून सतर्कतेचे आवाहन
आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर !
‘छावा’ चित्रपटातील संभाजी महाराजांच्या हत्येच्या प्रसंगाने रसिक गलबलले!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “दिल्ली आणि जवळपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सर्वांना शांत राहण्याचे आणि सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन, संभाव्य भूकंपानंतरच्या धक्क्यांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन. अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत,” असे त्यांनी ट्विट केले.