धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच सुपरहिट ठरला आहे. शुक्रवार, १४ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तिसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित या चित्रपटाची प्रेक्षकांना पूर्वीपासूनचं उत्सुकता होती. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंधाना यांच्या ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनचं चांगली कमाई केली आहे. या तीन दिवसांमध्ये चित्रपटाने एकूण ११६.५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ३१ कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर, ‘छावा’ने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ३७ कोटी रुपये कमावले. तर, तिसऱ्या दिवशी ‘छावा’ने ४८.५ कोटी रुपये कमावले ज्यामुळे चित्रपटाचे एकूण कलेक्शन ११६.५ कोटी रुपयांवर पोहचले आहे.
चित्रपटाने प्रदर्शनानंतर पहिल्या शनिवारी ३७ कोटी रुपये आणि पहिल्या रविवारी ४८.५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे पहिल्या आठवड्याच्या अंती हा सिनेमा सुपरहिट ठरून पहिल्या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाने ८५.५ कोटी रुपयांची कमाई केली.
हे ही वाचा :
११२ अनधिकृत भारतीयांची तिसरी तुकडी अमृतसरमध्ये दाखल
दिल्लीला ४.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का; पंतप्रधान मोदींकडून सतर्कतेचे आवाहन
आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर !
‘छावा’ चित्रपटातील संभाजी महाराजांच्या हत्येच्या प्रसंगाने रसिक गलबलले!
‘छावा’ सिनेमामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल याने साकारली असून त्याने या भूमिकेला न्याय दिला आहे. त्याचा वावर, छत्रपती संभाजी महाराजांचा लूक, संवाद, भूमिका या सगळ्याच बाबींवर त्याने उत्तम काम केले आहे. याशिवाय लक्ष्मण उतेकर यांनी ‘छावा’चे दिग्दर्शन केले असून सिनेमात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, डायना पेंटी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अनेक मराठी कलाकारांनीही सिनेमात काम केले आहे. सिनेमाचे बजेट १३० कोटी असून ‘छावा’ सिनेमाने बॉलिवूडला दमदार सुरुवात करुन दिली आहे.