झारखंडच्या गढ़वा जिल्ह्यातील एका जनजातीय कुटुंबाने ईसाई धर्माचा त्याग करून पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला आहे. कुटुंबाच्या घरी सत्यनारायण कथा आणि पूजा विधीपूर्वक पार पडली, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व ८ सदस्यांनी ‘घरवापसी’ केली.
या कुटुंबाचे प्रमुख गजेन्द्र मुंडा यांच्या वडिलांनी, दिवंगत बटेश्वर मुंडा यांनी वर्ष २००४ मध्ये हिंदू धर्म सोडून ईसाई धर्म स्वीकारला होता. त्यांना वाटत होते की त्यांच्या कुटुंबात आजारपण, भांडणं आणि कलह वाढले आहेत, आणि धर्मांतर केल्यास परिस्थिती सुधारेल. मात्र, आता कुटुंबाने सांगितले की त्यांचा गैरसमज दूर झाला आहे आणि त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेत ‘अग्निवीर’ संस्थेने त्यांना मदत केली.
दरम्यान, मध्य प्रदेशातील मैहर येथील हिंदू महिलांच्या एका गटाने रविवारी (२६ ऑक्टोबर) महिलांना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करण्याच्या मिशनऱ्यांच्या योजना उधळून लावल्या. हिंदू महिलांनी पोलिस ठाण्यात जाऊन संबंधितांविरुद्ध तक्रार दाखल केली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही ख्रिश्चन मिशनरी दोन महिलांसह हिंदू महिलांना पैसे आणि घराचे आमिष दाखवून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करत होते. पोलिसांनी त्यांना घटनास्थळीच अटक केली. अंदाजे ५० हिंदू महिलांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा कट रचला जात असल्याचे वृत्त आहे.
हे ही वाचा :
‘मोंथा’मुळे आंध्र प्रदेश, ओडिशाला रेड अलर्ट
आसाम हा बांगलादेशचा भाग असल्याचा नकाशा!
आरजी कर घटनेतून ममता सरकारने कोणताही धडा घेतलेला नाही!
पाक लष्कराचे सर्वोच्च जनरल मुहम्मद युनूस यांच्या भेटीला; चर्चेत दडलंय काय?
या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. सर्व आरोपींची चौकशी करण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असल्याने सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी म्हटले आहे.







