33 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
घरविशेषमुख्यमंत्री म्हणाले, सर्वसामान्यांचे सरकार! ताफ्याच्या प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको

मुख्यमंत्री म्हणाले, सर्वसामान्यांचे सरकार! ताफ्याच्या प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको

Google News Follow

Related

वाहनचालकांचा खोळंबा नको; पोलिस महासंचालक, आयुक्तांना निर्देश

प्रवासादरम्यान वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, सर्वसामान्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आदेश देऊन आपल्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना प्रवास मार्गिकेवरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होतो आणि त्यातून सर्वसामान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले आहेत. याबाबत त्यांनी आज पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत.

यापुढे मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी घ्या, अशी सूचना त्यांनी दिली आहे. हे सर्वसामान्यांचे सरकार असून व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य असल्याचे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

याआधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा बंगल्यावरून मातोश्रीला जात असताना कलानगर येथे सर्व वाहतूक रोखली जात असे. मुख्यमंत्र्यांचा ताफा मातोश्रीकडे जाण्यासाठी गेटमधून आत शिरल्यावर मार्ग सुरू केला जात असे. त्यावेळी कलानगरला असलेले रस्ते आणि वरील उड्डाणपुलावरील रहदारी थांबविली जात असे. या ताफ्याला अडथळा आणल्यावरून दोनवेळा दुचाकीस्वारांवर कारवाईही केली गेली. पण एकनाथ शिंदे यांनी मात्र हे सर्व बदलले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.

हे ही वाचा:

काळ बदलतोय! रणजीत सावरकरांना विधान परिषद सदस्यत्व मिळणार?

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट

‘धनुष्यबाण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही’

संजय पांडेंवर तीन गुन्हे दाखल, सीबीआयची छापेमारी

मुख्यमंत्री या नात्याने सतत प्रवास करावा लागतो. त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतूक रोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याचे गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रूग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो . त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा नाहक त्रास वाहनचालकांना नको, अशी मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा