उत्तर प्रदेशच्या अर्थसंकल्पात बलिया जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयाची भेट मिळाली आहे. यामुळे बलिया येथील भाजपा महिला आमदार केतकी सिंह यांच्यासह जिल्ह्यातील लोक आनंद व्यक्त करत आहेत. याच दरम्यान, बलिया येथील आमदार केतकी सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. आमदार केतकी सिंह यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की, ‘मेडिकल कॉलेजमध्ये मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालावी आणि त्यांच्या वैद्यकीय सेवांसाठी स्वतंत्र इमारत किंवा शाखा बांधावी, जेणेकरून हिंदू सुरक्षित राहू शकतील.’
मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्यांदाच बलिया येथे आलेल्या बांसडीह विधानसभेच्या फायरब्रँड भाजपा महिला आमदार केतकी सिंह म्हणाल्या, “जर मुस्लिमांना होळी, रामनवमी आणि दुर्गापूजेच्या वेळी समस्या येत असतील तर त्यांना उपचार घेण्यासही अडचणी येऊ शकतात. मी महाराजांना (मुख्यमंत्री योगी) विनंती करते की जेव्हा इतके पैसे खर्च केले जात आहेत, तेव्हा तेथे त्यांच्या उपचारासाठी एक वेगळी इमारत बांधावी.
हे ही वाचा :
सोने तस्करी प्रकरणात अट्रिया हॉटेल मालकाच्या नातवाला अटक
रान्या राव सोने तस्करी: प्रोटोकॉल उल्लंघन आणि आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश
मशिदींवर रात्रंदिवस वाजणारे भोंगे बंद करा
बघेल यांच्या घरावर ईडीच्या छाप्यानंतर गोंधळ घालणे योग्य नाही
पत्रकारांशी संवाद साधताना त्या पुढे म्हणाल्या, दिवाळीच्या मुहूर्तावर मेडिकल कॉलेज बांधण्यात येत आहे तेव्हा त्यांच्यासाठी एक वेगळे विंग बांधण्यात यावे. यामुळे हिंदू समाजाला सुरक्षित वाटेल. दरम्यान, आमदार केतकी सिंह यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत असून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.