जुन्या पिढी मधील माणसं सोनं जपून ठेवत होती. मात्र, मुंबईमध्ये आता सोन्यासारखीच किंमत घरांना आली आहे. जुन्या पिढी मधील माणसं सोनं जपून ठेवत होती. त्यामुळे घर विकू नका, पुढच्या पीढीला हे घरं द्यायचं आहे हे लक्षात ठेवा आणि या घरांना लाडक्या बहिणींचं सुद्धा नाव लावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळवासीयांना केले आहे. बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील ५५६ सदनिकांच्या चावी प्रदान कार्यक्रमांमध्ये फडणवीस बोलत होते.
फडणवीस म्हणाले, मुंबईमध्ये सोन्यासारखीच घरांची किंमत असून ती घरे विकू नका. अजित पवार यांनीही आपल्या भाषणांमध्ये घर विकू नका असं आवाहन केलं होतं, त्याचा धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले.
हे ही वाचा:
योगी आदित्यनाथांचे कौतुक केल्याची शिक्षा, सपाने महिला आमदाराची केली हकालपट्टी
‘हर घर तिरंगा’ अभियानात एनएसजीचे वीर सहभागी
एसएंडपी ग्लोबलने भारताला काय रेटिंग दिले ?
सीबीआयचे २१ कर्मचारी विशिष्ट, सराहनीय सेवा पदकाने सन्मानित
खऱ्या मुंबईकरांना मुंबईमध्ये आणणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. फडणवीस यांनी सांगितले की, ग्लोबल टेंडर करण्याचा निर्णय आपण घेतला. त्यानुसार प्रक्रिया पार पडली. टाटाने एलएनटी, शापूरजी पालनजी यांनी कामे घेतली आणि चांगल्या प्रकारची कामे होत आहे. २२ एप्रिल २०१७ ला टेंडर झालं. त्यानंतर अडचणी येत राहिल्या मात्र आपण काम करत राहिलो, असे फडणवीस म्हणाले.
चाळवासीयांना १५ लाखात आम्ही घर देत आहोत. खऱ्या मुंबईकरांना मुंबईत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही तसा निर्णय केला आहे. अभ्युदय नगर, अंधेरीतील प्रकल्प, जे बी नगर प्रकल्प देखील आपण करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, धारावी संदर्भात देखील निर्णय घेत आहोत. धारावीबाबत राजीव गांधी पुनर्विकास करू असं म्हणाले होते. मात्र, पुढे काही झालं नाही. आपण आता धारावी रिडेव्हलपमेंट प्रकल्प सुरू केला आहे. १० लाख लोकवस्तीचा आम्ही पुनर्विकास करत आहोत. एक नवीन शहर आम्ही वसवत आहोत. जो पात्र आहे त्याला नक्की घर मिळेल, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीडीडी चाळीने सामाजिक राजकीय आंदोलने पाहिली. स्वातंत्र्याची चळवळ पाहिली आहे. १०० वर्षांचा इतिहास पाहिला तर चाळींच्या भिंतीत अनेक कथा कहाण्या आहेत. तीन चार पिढ्या इथं गेल्या आहेत. त्यामुळे चाळींचा पुनर्विकास व्हायला हवा असं आमच म्हणणं होतं. बीडीडीमध्ये माझी मोठी सभा झाली होती. त्यावेळी अनेकांच्या घरी गेलो त्यावेळी काय अवस्थेत लोक राहत आहेत हे मी पाहिलं. झोपडपट्टी पेक्षा वाईट परिस्थिती होती. महायुती सरकार आल्यानंतर मागण्या पूर्ण करण्याची वेळ आली आहे हे लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली.







