30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरविशेषलसीचे दोन्ही डोस घेतल्यावर मृत्यूचा धोका ९५ टक्के कमी

लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर मृत्यूचा धोका ९५ टक्के कमी

Google News Follow

Related

देशात कोरोनाचे आकडे काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहेत. दुसरीकडे शासकीय स्तरावर कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात जनजागृती देखील केली जात आहे. आता या लसीच्या प्रभावासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय संशोधन अनुसंधान संस्था म्हणजेच आयसीएमआरनं लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात एक रिसर्च केला आहे. या रिसर्चमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर व्यक्तीचा मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांपर्यंत कमी होतो, असं समोर आलं आहे.

आयसीएमआरनं तामिळनाडूच्या पोलीस दलातल्या एक लाख १७ हजार ५२४  पोलिसांवर हा रिसर्च केला आहे. या रिसर्चदरम्यान लस घेतलेले पोलिस कर्मचारी आणि लस न घेतलेले पोलिस कर्मचारी यांच्यापैकी किती जणांचा कोरोनाने मृत्यू झाला याबद्दल निरीक्षण करण्यात आलं. आयसीएमआरनं १ फेब्रुवारी २०२१ ते १४ मे २०२१ या कालावधीत हा रिसर्च करण्यात आला.

या रिसर्चसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा एक डोस घेतलेले ३२ हजार ७९२ कर्मचारी निवडण्यात आले. लसींचे दोन्ही डोस घेतलेले कर्मचारी ६७६७३ होते तर १७०५९ पोलीस कर्मचाऱ्यांनी लस घेतली नव्हती. रिसर्चनुसार या कालावधीत ३१ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील ४ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तर ७ जणांनी एकच डोस घेतला होता. अन्य २० जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील हे नेते मोदी मंत्रिमंडळात निश्चित?

एअर इंडिया, बीपीसीएल पाठोपाठ ‘या’ कंपनीचेही खासगीकरण

एकनाथ खडसेंचा जावई ईडीच्या ताब्यात

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं ९८ व्या वर्षी निधन

यामुळं या रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीचे दोन्ही डोस अत्यंत परिणामकारक आहेत.  ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतला होता, त्यांना मृत्यूचा धोका ८२ टक्के तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका ९५ टक्क्यांपर्यंत मृत्यूचा धोका  कमी होता असं समोर आलं आहे. लस न घेतलेल्यांच्या तुलनेत लस घेतलेल्यांना हा धोका अत्यंत कमी असल्याचं देखील या रिसर्चमधून समोर आलं आहे.

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल कोरोनामुळे ९३० रुग्णांनी जीव गमावला आहे. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामुळे ४ लाख ४ हजार २११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा