26 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेषठाण्यात खड्ड्यांमुळे प्रवाशांचे मोडले कंबरडे

ठाण्यात खड्ड्यांमुळे प्रवाशांचे मोडले कंबरडे

Google News Follow

Related

ठाणे महापालिका हद्दीतले रस्ते हे पावसाळ्यात उखडले असून, जवळपास १५ दिवसांमध्ये हे रस्ते खराब झालेले आहेत. ही परिस्थिती ठाण्यातच नाही तर मुंबईतही हे असेच दृश्य पाहायला मिळते. ठाण्यातील रस्त्यावरील खड्डेभरणीची कामे करून अवघे १५ दिवस उलटले नाहीत, तोवर खड्डे पुन्हा पडले आहेत.त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहात आहे. काही भागांत रस्त्यांवर नवीन खड्डे पडले आहेत.

या खड्डय़ांच्या प्रवासामुळे वाहनचालक, प्रवासी हैराण झाले आहेत. घोडबंदर, कापुरबावडी, सेवा रस्ते, कॅडबरी उड्डाणपुलांच्या पायथ्याशी, नितीन कंपनी चौक, सावरकरनगर, लोकमान्यनगर, कोरस रस्ता, मॉडेला नाका येथील अ‍ॅपलॅब चौक, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागांतील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे.

ठाण्यातील रस्त्यांवर १ हजार २२२ खड्डे असल्याची बाब पुढे आली होती. ही आकडेवारी समोर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डेभरणीची कामे हाती घेतली होती. पंधरा दिवसांपूर्वीच खड्डेभरणीची कामे पूर्ण झाली होती. परंतु गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुजविलेले खड्डे पुन्हा उखडले असून काही रस्त्यांवर नवीन खड्डे पडले आहेत.

हे ही वाचा:

जिओ विरुद्ध एअरटेल आणि टाटा

कोविडमुळे अर्धमेले झालेलो…जलप्रलयाने सुपडा साफ झाला

पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस रखडल्या

दैनिक भास्कर समूहावर आयकर विभागाचे छापे

बाईकस्वारांना तर पाठदुखीमुळे त्रस्त व्हायची वेळ आलेली आहे. डांबर, सिमेंट ऐवजी मुरूम माती टाकून तात्पुरते खड्डे कसे तरी बुजवतात. विविध कारणांनी रस्ते पुन्हा खोदतात. एकूणच काय तर रस्त्यांचे काम नीट न झाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात खड्डे हे पडतातच. महापालिकेकडून अजूनही हे खड्डे बुजवण्याच्या कामामध्ये होत असलेली दिरंगाई आता वाहनचालकांच्या जीवावर बेतणारी आहे. खड्डे असताना त्यातून वाहने हाकणे आता अतिशय जिकीरीचे झालेले आहे. अनेकदा कंत्राटदारांकडून वरवरचे आणि निकृष्ट दर्जाचे काम केले जाते. त्यामुळेच ठाणेकरांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा