28 C
Mumbai
Friday, August 6, 2021
घरविशेषदरड कोसळल्याने पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस रखडल्या

दरड कोसळल्याने पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस रखडल्या

Related

कसारा घाटात दरड कोसळली

महाराष्ट्रात सगळीकडेच अतिवृष्टी सुरु आहे. अनेक ठिकाणी प्रवासी खोळंबले आहेत. यातच कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने हजारो प्रवासी मध्यरात्रीपासून इगतपुरी रेल्वे स्थानकावर १५-२० तासांपासून अडकून पडले आहेत. दरड कोसळली त्यावेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र लहान मुलांनाही याठिकाणी उपाशीपोटी थांबावं लागल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. नाशिकमार्गे मुंबईला जाणारी पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

इगतपुरी ते कसारा मार्गावर ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याने रेल्वे इगतपुरी स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. तेव्हापासून प्रवाशांचा लहान मुलांसह प्लॅटफॉर्मवरच मुक्काम आहे. एकीकडे रात्रभर मुसळधार पाऊस तर दुसरीकडे प्रशासनाकडून कुठल्याही स्पष्ट सूचना नाहीत. खाण्यापिण्याची कोणतीही सोय नसल्याने प्रवाशांना उपाशी पोटीच थांबावं लागलं.

नाशिकमार्गे मुंबईला जाणारी पंचवटी, राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्याचे हाल झाले आहेत. तर काही गाड्या मनमाडमार्गे वळवण्यात आल्या आहेत. ज्या गाड्या इगतपुरी नाशिकसह इतर स्थानकावर थांबवण्यात आल्यात त्या प्रवाशांना रस्ते मार्गाने इच्छित स्थळी पोहोचवण्यात आले. त्यामुळे अचानक आलेल्या या संकटाने यंत्रणेची त्रेधातिरपीट तर उडालीच. मात्र प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

हे ही वाचा:

जिओ विरुद्ध एअरटेल आणि टाटा

बदलापूरमध्ये पूरपरिस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला

स्वप्नील लोणकरच्या कुटुंबावरील कर्ज भाजपाने फेडले

परमबीर सिंग यांच्यासह ८ वरिष्ठ पोलिसांवर गुन्हा दाखल

रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दरड हटवण्य़ाचे काम सुरु केले. त्यामुळे डाऊन मार्गावरील एक लाईन सुरू करण्यात आली आहे. या लाईनहून  पंजाब मेल एक्सप्रेस आणि त्यानंतर मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेस नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे. अप मार्गावरील वाहतूक अजूनही बंद असून या मार्गावर काम सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,319अनुयायीअनुकरण करा
2,170सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा