मणिपूरच्या लीमाखॉंग पॉवर स्टेशनमधून मोठ्या प्रमाणावर इंधनाची गळती झाल्याची घटना घडली आहे. नाल्यांमध्ये इंधनाची गळती झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात राज्य सरकारने संबंधित विभागांना त्वरित कारवाई करण्यास सांगितले आहे. इंफाळ खोऱ्यातून जाणाऱ्या नाल्यांमध्ये हे इंधन सोडण्यात आले होते. काही भागात नाल्यामध्ये आगी लागल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
हेही वाचा..
उद्धव ठाकरेनंतर शरद पवारांच्या पक्षाबाबत टिकटिक सुरू!
ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या पाच दिवसांनंतरही शाहजहां यांचा ठावठिकाणा नाही!
राम मंदिराचे आमंत्रण धुडकावल्याने काँग्रेसमध्येच नाराजी!
१२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील प्रकल्पांचे उदघाटन!
लेमाखॉन्ग पॉवर स्टेशनमधून जड इंधनाची गळती झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे कांटोसाबल, सेकमाई इत्यादींमधून जाणार्या नाल्यांसोबत विसर्ग गळती होत आहे. हा प्रवाह खुरखुल-लोइटांग-कामेंग-इरोइसेम्बा-नांबूल मार्गे वाहत खालीच्या प्रवाहात इम्फाळ नदीला मिळतो, असे सरकारने आदेशात म्हटले आहे.सर्व संबंधितांनी यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि कौशल्याच्या दृष्टीने सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करून, पर्यावरणीय आपत्ती टाळण्यासाठी त्वरित आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली असल्याचेही त्यात नमूद आहे.